Subscribe to our Newsletter
मराठवाडा

भारतीय दलित पँथ ची दुसरी राज्यस्तरीय पुनर्बांधनीची बैठक २२ नोव्हेंबर रोजी जालना येथे होणार : अँड. रमेशभाई खंडागळे


जालना /MH20LIVE NETWORK

भारतीय दलित पँथरची दुसरी राज्यव्यापी पुनर्बांधनीची बेठक २२ नोव्हेंबर रोजी जालना येथे
आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती अँड. रमेशभाई खंडागळे यांनी दिली आहे. पहिली
बैठक १ ऑक्टोंबर रोजी औरंगाबाद येथे आयोजीत करण्यात आली हाती. या बैठकीला
राज्यभरातून कार्यकर्त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला. बैठकीला राज्यभरातून ज्येष्ठ
विचारवंत,कार्यकर्त, युवकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीमध्ये दुसरी व्यापक बैठक घेण्याचे ठरले होते. त्या
निर्णयाप्रमाणे येत्या २२ नोव्हेंबर २०२० रोजी जालना येथे राज्यव्यापी पुनर्बांधनी बेठक आयोजीत
करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये संघटनात्मक बांधणी आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार
आहे. तरी या बैठकीस युवक, महिला, कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक बैठकीचे साक्षीदार होऊन
सम्यक क्रांतीच्या नव्या लढयास सज्ज होण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन
अँड. रमेशभाई खंडागळे (औरंगाबाद), रामचंद्र माने (पुणे), दशरथ लोहबंदे (नांदेड), अँड.
शिवाजी आदमाने (जालना), दिगंबर मोरे (नांदेड) यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close