Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

नाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले

पैठण : किरण काळे पाटील

पैठण येथील नाथसागर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढल्याने शुक्रवारी पहाटे बारा वर्षानंतर आपत्कालीन दरवाजे उघडले असून गोदावरी नदीमध्ये जवळपास एक लाखाच्या आसपास पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना  कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी केले आहे.

गत चौदा दिवसापासून येथील नाथसागर धरणातून गोदावरी नदीत कमी अधिक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा  विसर्ग वरील धरणातून येणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन करण्यात येत होता. मात्र गुरुवारी मध्यरात्री त्या धरणात येणारी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने शुक्रवारी पहाटे प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. धरण निर्मिती झाल्यापासून तब्बल बारा वर्षापूर्वी सन १९७६ मध्ये १ लाख ५० हजार क्युसेक विसर्ग, १९८० मध्ये १ लाख ३ हजार, १९९० मध्ये १ लाख ८७, ६५२, १९९४ मध्ये १ लाख १६ हजार, २००६ मध्ये २ लाख ५० हजार ९९५, २००८ मध्ये १ लाख ५४ हजार ५०४ अशा पद्धतीने गोदावरी नदीमध्ये एकूण २७ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तब्बल बारा वर्षानंतर २०२० मध्ये नाथसागर धरणातून आज (दि.१८) दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत रोजी ९४ हजार ४४५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीची पाणी वहन क्षमता मोठी असल्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना स्वतः सावधान राहून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नाही असे आवाहन तालुका प्रशासनवतीने करण्यात आले आहे. सध्या या धरणामध्ये ५० हजार ५०० क्युसेक पाण्याचे आवक येत आहे. आवक कमी झाल्यास सायंकाळपर्यंत कुठल्याही वेळेत २७ पैकी ९ असलेले आपात्कालीन दरवाजे बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व अधिकारी सज्ज झालेले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close