Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

थेरगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार पैठण तालुक्यातील शेतवस्तीवरील घटना

mh20live network

पाचोड : शेत वस्तीवर राहणार्‍या एका अल्पवयीन युवतीवर दोन तरुणांनी मध्यरात्रीच्या वेळी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पैठण तालुक्यातील थेरगाव शिवारात रविवार 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे. या घटनेविषयी पाचोड पोलिसात दोन आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैठण तालुक्यातील थेरगाव येथील अल्पवयीन युती ही आपल्या आई-वडिलांबरोबर थेरगाव शिवारातील शेत वस्तीवर राहते. आई-वडील हे शेतामध्ये काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत. तर थेरगाव शिवारातील त्याच परिसरात शेत वस्तीवर राहणारे आरोपी युवक ज्यामध्ये जुनेद दस्तगीर पठाण व दीपक आहिरे हे अनेक दिवसापासून अल्पवयीन युवतीवर नजर ठेवून होते. रविवार 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास जुनेद पठाण व दीपक आहेर या दोघांनी अल्पवयीन युतीच्या परिवारातील मंडळींच्या मोबाईलवर दोन ते तीन वेळा फोन लावले. रात्रीच्या वेळी सगळे परिवारातील सदस्य रोजच्या नित्यनेमाप्रमाणे जेवण करून झोपी गेले. यानंतर अल्पवयीन मुलीने फोन उचलला. आम्ही तुमचे नातेवाईक आहोत असे या दोन तरुणांनी फोनद्वारे सांगितले. मात्र शेत वस्तीवर असलेल्या घरामध्ये मोबाईलला नेटवर्कचा अडथळा होत असल्याने संभाषण व्यवस्थित होत नव्हते. ती युती फोन घेऊन घराच्या बाहेर आली असता आरोपी दोन तरुणांनी तिचे तोंड दाबून तिला शेतामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घराच्या मंडळींना या घटनेविषयी कोणाला काही सांगितल्यास तुला जिवंत मारून टाकू अशी धमकी देत तेथून पळ काढला. अल्पवयीन मुलीने रडत रडत हा झालेला प्रकार सकाळी तिच्या आई-वडिलांना सांगितला. आई-वडिलांनी तात्काळ पाचोड पोलीस स्टेशन गाठले व या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना दिली. बलात्कार करणारे आरोपी जुनेद दस्तगीर पठाण वय वर्षे 23 व दीपक आहेर या दोघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, पैठण उपविभागीय पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस करत आहेत. या घटनेतील आरोपी रात्री उशिरापर्यंत फरार असल्याची माहिती आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close