Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

झेप ” पुरस्काराने प्रतिभावंतांचा सन्मान

विशेष प्रतिनिधी : कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या बावीस वर्षापासून झेप साहित्य चळवळीच्या वतीने ” मातोश्री हरणाबाई जाधव ” राज्य पातळीवरील मानाचे पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक विजयकुमार कस्तुरे, शिक्षण तज्ञ संज्जन टाकसाळे, पत्रकार संजय मोहिते, कथाकार बबन महामुने, प्रसिद्ध कवयित्री छाया बैसाणे, विख्यात लेखक दीपक सोनवणे, समीक्षक किरण डोंगरदिवे, नाटककार राजेंद्र सपकाळ, संशोधक टी. एस. चव्हाण आणि ज्येष्ठ लेखक त्र्यंबक बरकले यांना हिवरा आश्रम येथील अखिल भारतीय झेप साहित्य संमेलनात २० डिसेंबर ला संमेलनाध्यक्ष डॉ. विनायक तुमराम, प्राचार्य डॉ. एम. डी. कड पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक विजयकुमार कस्तुरे हे गेल्या साठ वर्षापासून अविरत सामाजिक कार्य करीत आहेत. ते उत्तर गायक असून सर्व प्रकारचे वाद्ये त्यांना वाजता येतात. तसेच ते चांगल्या प्रकारे कवी आहेत. त्यांच्या कविता आजही वर्तमान पत्रातून प्रकाशित होत आहेत. संज्जन टाकसाळे हे गेल्या वीस वर्षापासून शिक्षण सेवेत असून आजपर्यंत त्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी व पालकांच्या हिताचे कार्य केले आहे. ते उत्तर कवी असून त्याच्या कविता नेहमी प्रकाशित होत असतात. संजय मोहिते गेल्या पंचवीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात उत्तर कार्य केले आहे. सध्या ते एका वर्तमान पत्रात उपसंपादक पदावर कार्यरत आहेत. बबन महामुने हे प्रसिद्ध कथाकथनकार असून त्यांच्या कथा विद्यापीठात अभ्यास क्रमात असून महुवा देशपातळीवर कथाकथन चे कार्य अविरत सुरु आहे. छाया बैसाणे ह्या एक उत्तम कवयित्री असून सुप्रसिद्ध गझलकार सुद्धा आहेत. त्यांच्या कवितेला राज्य व देशपातळीवर विविध संस्थांनी सन्मानित केले आहे. विविध साहित्य संमेलनात त्या नेहमी कविता व गझल सादर करीत असतात. त्यांचे शिक्षण क्षेत्रात देखील चांगले काम आहे. दीपक सोनवणे यांनी आतापर्यंत सुमारे अठ्ठावीस कादंबरी चे पुस्तक लिहिले असून त्यांची काही पुस्तके शासनाच्या यादी मध्ये आले आहे. त्यांना अनेक संस्थानी सन्मानित केले असून त्यांचं शिक्षण क्षेत्रातील काम सुद्धा वाखरण्यासारखे आहे. किरण डोंगरदिवे यांनी नवोदित लेखकांबरोबरच नामांकित लेखकांच्या सुमारे शंभर च्या वर पुस्तकाचे परीक्षण केले असून एक समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना कविता करण्याची आवड असून त्यांच्या नावावर अनेक पुस्तके आहेत. शिक्षण क्षेत्रातील कामही त्यांचे चांगले आहे. राजेंद्र सपकाळ हे एक सुप्रसिद्ध नाटककार, लेखक व कवी असून त्यांनी आतापर्यंत डझनभर नाटकांची पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी नाटकांचे प्रयोग महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर देखील केले आहेत. त्यांच्या नाटकाला राज्य पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात चांगले घर केले आहे. टी. एस्. चव्हाण यांनी आदिवासी समाजातील भटकंती वर संशोधन केले असून ते एक चांगले अभ्यासक आहेत. भटकंती करुन पोट भरणारे व्यक्ती यांच्या जीवनावर त्यांनी चांगला अभ्यास केला आहे. ते एक चांगले लेखक असून अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. त्र्यंबक बरकले हे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे भक्त असून त्यांनी ग्रामीण जीवनावर अनेक लेखन केले आहे. त्यांची ओळख एक ग्रामीण कवी म्हणून आहे. त्यांचे अनेक पुस्तके प्रकाशित असून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशा मान्यवर प्रतिभावंतांच्या कार्याची दखल झेप साहित्य चळवळीचे संस्थापक डी. एन. जाधव यांनी घेतली असून त्यांच्या कार्याचा गौरव त्यांच्या चाहत्यांना आनंद देणारा आहे, एवढे मात्र खरे !

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close