‘झी सिनेमा’ वाहिनीवरील ‘सनक’च्या जागतिक टीव्ही प्रीमिअरमध्ये पाहा अभूतपूर्व पॉवर पॅक्ड पंचेस!
जेव्हा त्याचे डोके सटकते, तेव्हा तो वेडापिसा होतो, तो आहे बॉलीवूडचा अल्टिमेट अॅक्शन हिरो, त्याचे नाव आहे विद्युत जामवाल! या धाडसी अॅक्शन हिरोचे जिवावर उदार होऊन केलेले जबरदस्त अॅक्शनप्रसंग ‘सनक’मध्ये पाहण्यास सिध्द व्हा. जेव्हा काही दहशतवादी एका रुग्णालयाचाच ताबा घेतात, तेव्हा सामान्य माणसांना वाचविण्यासाठी एक सामान्य माणूसच हिरो बनून येतो. नेहमीप्रमाणेच आपल्या चपळ लत्ताप्रहारांनी, जबरदस्त ठोशांनी आणि उलटउड्या मारीत हाणलेल्या ठोशांनी विद्युत जामवालने अॅक्शनप्रसंगांचा स्तर उंचावीत सर्वांची मने जिंकली आहेत. या चित्रपटात अनेक तणावपूर्ण प्रसंग असले, तरी प्रेमाची भावना या एकहाती हाणामारीवर, गूढ, नाट्यपूर्ण तसेच थरारक प्रसंगांवर कशी मात करते, ते 27 मार्च रोजी दुपारी 12.00 वाजता ‘झी सिनेमा’वर प्रसारित होणार््या विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘सनक’च्या जागतिक टीव्ही प्रीमिअरमध्ये पाहायला मिळेल.
सनशाईन पिक्चर्स प्रा. लि. च्या सहकार्याने झी स्टुडिओजतर्फे प्रस्तुत सनक मध्ये एक से एक कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचा खरा नायक हा शक्तिशाली हिरो जरी असला, तरी त्यात खलनायक आणि अन्य व्यक्तिरेखाही आहेतच. रुग्णालयावर ताबा बसवून त्यातील रुग्णांना ओलिस धरणारा उलट्या काळजाचा, भयावह आणि निग्रही खलनायक संजूची भूमिका चंदन रॉय संन्याल याने साकारली आहे. आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपटात भूमिका साकारणार््या रुख्मिणी मैत्रा हिच्या दर्जेदार अभिनयाची सार्वत्रिक प्रशंसा होत आहे. तसेच आपली भूमिका दमदारपणे आणि सफाईदारपणे साकारणार््या नेहा धुपिया या गुणी अभिनेत्रीच्या कामगिरीचीही स्तुती होत आहे.
‘सनक’च्या जागतिक टीव्ही प्रीमिअरच्या प्रसारणाबद्दल विद्युत जामवाल म्हणाला, “अॅक्शनपटांमध्ये मी जेव्हा काहीतरी अशक्य असे प्रसंग पाहतो, तेव्हा ते कसे साकारले गेले असतील, याची उत्सुकता मला लागते. ही उत्सुकताच माझा विकास घडविते. माझ्याभोवती असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मी प्रेरणा घेत असतो. दर चित्रपटातून मी काहीतरी नवं प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करतो आणि निव्वळ याच एका कारणासाठी सनकसारख्या चित्रपटात मी भूमिका स्वीकारली. या अॅक्शनपटात तुम्हाला सखोल कथानक मिळेल, याचं संगीत खूपच सुंदर आहे आणि दिग्दर्शनात स्पष्टता आहे. आज तंत्रज्ञानाने आघाडी घेतली असली, तरी माझा आजही मानवी क्षमतेवर अधिक विश्वास आहे. विशेषत: अॅक्शनपटांबाबत माझं हे मत आहे. सनकमध्ये मला अशा स्टंट प्रसंग स्वत:च साकार करण्याची संधी मिळाली. मी दररोज खूप परिश्रम घेत असे. त्यामुळे मला अधिकच उत्साह येत असे.”
‘सनक’चे निर्माते विपुल अमृतलाल शाह म्हणाले, “सनक हा विद्युतबरोबरचा माझा पाचवा चित्रपट आहे. त्याच्याबरोबर काम करतानाचा अनुभव नेहमीच फार छान असतो. तो दर चित्रपटासाठी खूप पूर्वतयारी करतो, त्याला नवनव्या कल्पना सुचतात. तो कामाबाबत अत्यंत शिस्तप्रिय असल्याने त्याच्याबरोबर अगदी सहजतेने काम पार पडतं. या चित्रपटाला प्रदर्शित झाल्यानंतर फार मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता झी सिनेमा वाहिनीवर त्याचा जागतिक प्रीमिअर प्रसारित होण्याची आम्ही उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहोत. टीव्हीची एक खासियत म्हणजे चित्रपटाची कथा तो देशभरातील घराघरात आणि प्रत्येक कुटुंबात घेऊन जातो. आता त्याचला कसा प्रतिसाद मिळतो, त्याकडे आमचं लक्ष लागून राहिलं आहे.”