Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

नायगावात विद्युत शॉक लागून तरुण युवकांचा मृत्यू

    नरसीफाटा / शेषेराव कंधारे      

     बोटकबिलोली येथील तरुण युवक बालाजी केरबा कु-हाडे वय वर्ष 50 रा.बेटकबिलोली हे नायगाव येथील ज्ञानेश्वर नगरात आपल्या स्वताचे नवीन घराचे बांधकाम सुरू असून त्या घरावर पाणी मारत असताना विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि२० डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता च्या सुमारास घडली आहे. लक्ष्मण केरबा कु-हाडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुण नायगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघाती निधनाची माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  नायगाव तालुक्यातील बैठकबिलोली येथील रहिवासी असलेले गावोगावी मुरमुर्याचा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवणारे बालाजी केरबा कुऱ्हाडे हे नायगाव येथील शहरातील ज्ञानेश्वर नगर मधील आपल्या घराचे नवीन बांधकाम सुरू असल्यामुळे बांधकामावर दररोज प्रमाणे पाणी मारण्यासाठी गेले असता अचानक त्यांना विद्युत शॉक लागून निधन झाले . आपले वडील बालाजी कु-हांडे हे खुप वेळ झेले घरी परत कसे काय  आले नाही म्हणून मुलाने फोन लावला असता फोन बंद दिसून आला म्हणून त्याने घटनास्थळी येऊन पाहिले असता आपल्या वडिलांना शॉक लागून खाली पडल्याचे दिसून आले त्यांनी तात्काळ लाईट बंद केली तेव्हा आपले वडील मृत्यू पावले असल्याचे समजले व त्यांनी घरी फोन करून सगळी माहिती सांगितली हे माहिती समजतात बैठक बिलोली येथील सरपंच राहूल पाटील नखाते घटनास्थळी येवुन सदरील माहिती नायगाव पोलिसांना कळविले यावरून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला सदरील मृत देह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन उत्तरीय तपासणी नंतर सदरील  मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. मयताचे भाऊ लक्ष्मण केरबा कु-हांडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुण नायगाव पोलीस ठाण्यात  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघाती निधनाची माहिती मिळाताच  सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत  असून त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा आहे अकस्मात मृत्यू झाल्यामुळे घरातील कर्ता व्यक्ती  मृत्यू पावल्याने  संसार उघड्यावर पडला असून शासनाच्यावतीने  मृत्यू पावलेल्या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close