Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादक्राईम

ट्रॅक्टरच्या चारा कुट्टी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू


कन्नड
/कल्याण पाटील mh20live NEwtowrk

   ट्रक्कर मशीनच्या सहाय्याने मका चा-याची कुट्टी करत असताना कुट्टी मशीनचा पट्टा तुटुन मशीनच्या चाकाचा कबरेला चोरात मार लागुन शरीराचे दोन तुकडे झाल्याने एकनाथ तुळशीराम भोजणे (वय२२) या.तरुणाचा जागीत मुत्यु झाल्याची घटना पाचच्या सुमारास तालुक्यातील विटा येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी किं एकनाथ भोजणे या तरुणाने एक महिण्यापुर्वी नवीन टँक्टर वरील चाराचे नवीन कुट्टी मशीन घेतले होते.  टँक्टर घेतल्यापासून दररोज चाराची कुट्टी करण्याचे काम सुरू होते. रविवारी विटा येथील  कुषि सहाय्यक प्रमोद पुरी यांच्या शेतात मका चाराची कुट्टी करत असताना अचानक मशीनचा पट्टा तुटल्याने टँक्टर चालुच असल्याने कुट्टी मशीनचे चाकाचा कबरेला एवढा चोरात मार लागला काही क्षणातच एकनाथ भोजणे या तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे झाले. यामुळे त्याचा जागीत मुत्यु झाला. मशीनची गतीच एवढी जोरात होती एक चाकाने जीव घेतला तर दुसरे एक तब्बल अर्धा किलोमीटर वर जाऊन पटले. सदरील घटनेची माहिती देवगांव पोलीसांना मिळताच पोलिस कर्मचारी भास्कर खुळे , सुदाम साबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन  मुतदेह शवविच्छेदन करण्यासाठी  औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.  वैद्यकीय अधिकारी प्रदिप कांबळे, डॉ परेश चव्हाण यांनी शवविच्छेदन करुन मुतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्याच्या पच्छात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी देवगांव ( रंगारी ) पोलिस ठाण्यात अकस्मातची नोंद करण्यात आली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी भास्कर खुळे ,सुदाम साबळे पुढील तपास करीत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close