Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

घर घर मे योग परिवार के साथ योग

mh2olive

आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून राेजी ऑनलाइन योगाभ्यास प्रात्यक्षिकात सहभागी होण्याचे आयुष विभागामार्फत जनतेला आवाहन
अलिबाग,जि.रायगड,दि.21 – सन 2015 पासून 21 जून रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. योगशास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह थायरॉईड, वृद्धी/क्षय, मनोविकार, संधिवात तसेच सध्याच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार योग करण्याने कमी होऊ शकतात.
दरवर्षी योग दिवस कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पण सध्या देशात काेविड-19 आजाराचा प्रादूर्भाव असल्याने लोकांनी जास्त संख्येने एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने योग प्रात्यक्षिक आसने घरांमध्येच करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे 6 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची संकल्पना घर घर मे योग परिवार के साथ योग ही ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे घरात कुटुंबासोबत राहून सोशल डिस्टंसिंग चे पालन करून योगाभ्यास करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
घरात राहून योग्य अभ्यास केल्याने संसर्गजन्य कोरोना विषाणू पासून बचाव होऊ शकतो. तसेच योगासने केल्यामुळे आपणास कोरोनाच्या सदृश्य परिस्थिती मध्ये व श्वसन संस्था रोगप्रतिकारक शक्ती व मानसिकदृष्ट्या सबळ राहण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणून दि. 21 जून 2020 रोजी घर घर मे योग्य या संकल्पनेवर आधारित योग करण्यात यावे, असे जिल्हा आयुष विभागातर्फे जिल्हा आयुष अधिकारी डॉ.सौ हेमा भोपाळे यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन दि.21 जून रोजी सामुदायिक स्वरूपात साजरा न करता घरामध्येच आपल्या कुटुंबासोबत सोशल डिस्टंन्सिंग चे पालन करून साजरा करण्यात यावा.
केंद्र शासनाने http://yoga.ayush.gov.in/yoga/ या वेबसाईटवर दि.21 जून 2020 रोजी करावयाच्या प्रात्यक्षिकांचा कॉमन योगा प्राेटोकॉल (CYP) व्हिडिओ व पत्र प्रसिद्ध केलेे आहे. त्याप्रमाणे घरामध्ये योग प्रात्यक्षिके करावीत. दि.21 जून 2020 रोजी सकाळी 7 ते 7.45 पर्यंत कॉमन योगा प्रोटाेकॉल (CYP) नुसार योग प्रात्यक्षिके करावीत त्यानंतर पुढील 15 मिनिटे इतर योगाभ्यास व कपालभारती, अनुलोम-विलोम, भ्रमरी यासारखे प्राणायाम याेग प्रकार करावेत.
या माहितीचा उपयोग करून आपले व आपल्या कुटुंबियांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील, यासाठी सर्वांनी दि.21 जून रोजी योग दिनाच्या या ऑनलाइन प्रात्यक्षिक शिबिराच्या माध्यमातून योगाभ्यास करावा, असे आवाहन आयुष विभागामार्फत डॉ. हेमा भोपळे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close