Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

लतिका आणि अभिमन्यूची जुळणार रेशीमगाठ !

लतिका आणि अभिमन्यूची जुळणार रेशीमगाठ !

सुंदर दिसणं ही प्रत्येकाचीच स्वाभाविक भावना असते… सौंदर्याची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगळी असते… याचविषयाला धरून कलर्स मराठीने एक आगळी वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली… आपण समाजात बघतो की, थोड्या स्थूल असणाऱ्या मुलीला ‘नकार’ देणारे तिच्या मनाचे सौंदर्य, तिच्यातील इतर गुणांची दखल घेत नाहीत. अशाच एका लठ्ठ पण गोड मुलीची दमदार गोष्ट म्हणजेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’… आपल्या मालिकेतील सुंदराला देखील अश्याच नकारांना सामोरी जावे लागले… पण बघता बघता तिला सज्जनरावांकडून लग्नासाठी होकार आला… लतीच्या घरामध्ये लगीनघाई सुरू झाली… या लग्नात अनेक विघ्न देखील आले…पण आलेली सगळी विघ्नं दूर करत शेवटी तो दिवस आला… पैशांच्या झालेल्या गडबडीमुळे सज्जन आणि त्याच्या घरच्यांनी लग्नाच्या दिवशी नकार दिला आणि लतिकाला मंडपात सोडून निघून गेले… मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे… हा सगळा झालेला प्रकार लतिकाच्या वडिलांसाठी सहन करणं अशक्य होऊन बसले आहे… त्यांची ही स्थिति बघता अभिमन्युचे वडिल एक निर्णय घेतात की लतिकाचे लग्न अभिमन्युशी होणार… जोडीदाराविषयी आपली काही स्वप्न असतात अगदी तशीच लतिकाची आणि अभिमन्यूची आहेत… पण, अभिमन्युची ही स्वप्न मात्र स्वप्नच रहाणार… कारण आता त्याला लतिकाशी लग्न करण्यावाचून कोणताही पर्याय नाही… कसा पार पडेल हा लग्नसोहळा ? अभि लतिची लग्न करण्यास होकार का देईल ? लग्नानंतरचा लति आणि अभिचा प्रवास कसा असेल ? हे दोघे सुखी संसार करू शकतील ? तिच्या मनाचं सौंदर्य, फिटनेसचं अतोनात वेड असलेल्या बालमित्राने कधीच पाहिलं नाही पण तिच्या नवर्‍याला ते दिसेल ? नक्की बघा लग्न विशेष भाग १६ ऑक्टोबर रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर. यापुढे मालिकेत काय होते ते जाणून घेण्यासाठी बघत रहा ‘सुंदरा मनामध्ये भरली’ सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

             नियतीचा खेळ काही असा की, अभिमन्यु आणि लतिकासमोर एकमेकांशी लग्न करण्याची वेळ येणार आहे… बापूंसाठी लतिका लग्नास तयार झाली आहे… पण आता अभिमन्यु मंडपात येईल ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे… हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा लग्न विशेष भाग १६ ऑक्टोबर रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close