Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

चिंताजनक: लस घेतल्यानंतरही उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

उस्मानाबाद : उस्मानाबादमधून एक चिंता निर्माण करणारी बातमी समोर येत आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे त्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हणजेच ८ फेब्रुवारी रोजी कोरोनाची लस घेतली होती. मात्त्यांर, आता त्यांच्यासोबत पत्नी प्रियांका बोकील यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मागील काही दिवसांपासून शासकीय कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली. लोक मास्क न घालता गर्दी करत. आपण त्यांना सांगितल्यावर मास्क लावत. पण आपल्याबाबतीत तोवर व्हायचा तो परीणाम झालाच असे म्हणावे लागेल. त्यामुळे नो मास्क नो एन्ट्री आवश्यक आहे.

मी दोन आठवड्यांपूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पण कोविड विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात . त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने यासाठीच दिल्या आहेत.
हे सर्व पाहता आपण सर्व फ्रंट लाईन वर्कर्स जसे की महसूल, आरोग्य, पोलीस यांनी अत्यंत सावध राहावे. कोणतेही लक्षण अंगावर न काढता तपासणी करून घ्या.

आपल्याला समाधान आहे की उस्मानाबाद जिल्ह्यात मागील सहा महिन्यात ज्या सोयीसुविधा आपण शासकीय रुग्णालयांत निर्माण केल्या त्याचाच लाभ मलाही मिळत आहे.

मागील आठवडाभरात आपण कोविड च्या दुसऱ्या लाटे साठी तयार सुरू केली आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये आपल्याकडे केवळ ६० ऑक्सिजन बेडस , १८ व्हेंटिलेटर उपलब्ध होते. आज फेब्रुवरी २०२१ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात ११०० ऑक्सीजन सपोर्टेड बेडस् आहेत. १९६ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. इतरही अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. दुसऱ्या लाटेसाठी तयारी करताना अँटीजन किट्स, N95, नवीन ऑक्सीजन सिलेंडर, नवीन २०० ऑक्सीजन लाईन, 2 डी इको व इतर नवी यंत्रसामग्री याबाबत नियोजन केलेले आहे.
९६० सीसीसी बेड्सची सुविधा पूनःस्थापित करण्याचे काम वेगात सुरू आहे.

लक्षणे असणाऱ्या सर्व व्यक्तींची चाचणी, विलगीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसींग ही प्रक्रिया वेगात राबवायची
आहे. लोकांनी कोणतेही लक्षण अंगावर काढू नये यासाठी सरकारी खाजगी हॉस्पिटल्स व सर्वांनीच जनजागृती केली पाहिजे.
किंबहुना मी लस घेतली आहे त्यामुळे ताप आला तरी कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही असे मानून दुर्लक्ष केले असते तर माझ्याकडून लोकांना संसर्ग झाला असता. माझ्यासोबत माझी पत्नी प्रियांका बोकील याही कोविड पोसिटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे कुटुंबीयांची कोविड तपासणी महत्वाची ठरते. यामुळे नागरिकांना पुनश्च आवाहन की कोणतेही लक्षण अंगावर काढू नये. लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी.

काल केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची एसओपी प्राप्त झाली आहे. त्या एसओपी आणि राज्य शासनाच्या विविध सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
आपण सर्वजण मागील एक वर्षापासून कोविडच्या साथीचा सामना करत आहोत. इतिहासाला नोंद घ्यावी लागेल इतके मोठे काम महाराष्ट्रातील यंत्रणांनी केले आहे. पुढेही करत राहू. अशी सदिच्छा श्री .कौस्तुभ दिवेगावकर
यांनी व्यक्त केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close