Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

जागतिक हिवताप दिन साजरा जनतेस झिरो हिवताप रुग्ण करण्याचे अहवान डॉ. एस. सी. कडले

      जालना दि.25- आज जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा हिवताप  अधिकारी डॉ. एस सी कडले यांचे जनतेस झिरो हिवताप करण्याचे अहवान करण्यात आले आहे.

             हिवताप रोगावर मात करायची असेल तर सरकारी आरोगय यंत्रनेच्या प्रयत्नाबरोबर जनतेचा सहभाग व सहकार्य महत्वाचे आहे. कोविड -19 चा संसर्ग असल्याने सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही. परंतू हिवताप या विषयी जनतेमध्ये जागृती  निर्माण होऊन हिवताप विरोधी उपाय योजनांच्या अमलंबजावणी मध्ये जनसहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने 25 एप्रिल  हा जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला आहे.

 नागरिकामध्ये वाढलेली जागरुतता आणि कार्यतत्पर आरोगय सेवा  यांचा सकारात्मक परिणामुळे  सन 2021 मध्ये हिवतापच्या रुग्णाचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. तसेच मागील तीन वर्षात मध्ये सन 2018 मध्ये 298945 रुग्णची तपासणीमध्ये 1 काचे हिवताप रुगण आढळून आले, सन 2019 मध्ये 305401 रुगणाची तपासणी मध्ये 3 रुग्ण आढळून आले, सन 2020 मध्ये 214061 रुग्णाची तपासणीमध्ये 1 रुग्ण आढळून आले आहे.  सदर प्रमाण हे यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात आलेल्या हिवताप रक्त नमुन्याच्या तुलनेत अत्यष आहे. त्यामुळे जालना जिल्हा हा झिरो हिवताप रुग्ण करणे शक्य आहे याकरीता गरज आहे ती फक्त जनतेच्या सहाकार्याची व डासाची पुर्ण उचाटटन त्यांचा दंश होवू  न देणे हा मेलरीया पासून स्वत:ला वाचविण्याचा प्रभावी उपाय आहे. डासांवर नियत्रंण ठेवण्यासाठी मासे हे एक प्रभावी जिवशास्त्रीय उपाय योजना आहे यासाठी जिल्ह्यात 241 ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र सुरु केले आहेत. यापैकी 8 जालना शहरात आहे  त यातून पैदास होणारे गप्पी मासे हे नाले, गटारी, डबके व ज्या ठिकाणी पाणी साठा होतो तेथे सोडले जातात. तसेच हिवताप प्रतिबंधात्मक उपाय योजना- हिवताप आजार रोखण्यासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवा, आळवड्यापेक्षा जास्त पाणी साठवून ठेवू नका, आठवड्यातून  दोन वेळेस पाणी साठे कोरडे करुन पाणी भरावे, दर आठवड्याला कुलर स्वच्छ करावे, मच्छर दाणीचा वापर करावा, डासांना पळवून लावण्याऱ्या साधानाचा वापर करावा डास भक्षी  ग्पपी मासे पाण्यात सोडावे, तापाचा रुगण आढळून आल्यास त्याला तत्काळ रुगनालयात नेवून औषधोपचार करावा या उपाययोजनाची काटेकोरपणे अमंलबजावणी केल्यास हिवताप चा प्रसार रोखण्यास मदत होईल असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस सी कडले यांनी जनतेस केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close