Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरु फर्दापूर ते अजिंठा घाटापर्यंत दरोज वाहतूक कोंडी;धुळीचा त्रास वाढला

सागर भुजबळ mh20live Network
फर्दापूर – औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरु असल्याने फर्दापूर(ता.सोयगाव)येथील हुतात्मा स्मारक बसस्थानक,मुख्यबसस्थानक परीसर ते अजिंठा घाटा पर्यंत वाहन धारकांना दरोज वाहतूक कोंडी व धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने या परीसरातील महामार्गाचे काम त्वरित उरकून काम सुरु असलेल्या काळात दिवसातून तीन वेळेस महामार्गावर पाणी शिंपडण्याची मागणी स्थानिक नागरीक व वाहन चालकांन कडून करण्यात येत आहे.या बाबत सविस्तर वृत्त असे की मागील तीन वर्षापासून औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम करण्यात येत आहे या कामासाठी कनट्रक्षन कंपनीने पूर्वीचा महामार्ग दोन्ही बाजूने उकरून टाकला असून उकरलेल्या एकाबाजूने सिमेंट महामार्ग बांधणीचे काम संथ गतीने सुरु आहे,तर दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोकळी सोडली आहे दरम्यान एकेरी कच्या मार्गावर वाहनांची वर्दळ होत असल्याने महामार्गावर धुळीचे मोठमोठे लोट उठून या धुळीचा वाहनधारकांन सह हुतात्मा स्मारक,अरिहंतनगर व बसस्थानक परीसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,सदरील परिसर 24 तास धुलीकणांनी व्याप्त राहत असल्याने या परीसरातील नागरिकांना शारीरिक व्याधी जडून त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती वाटत असल्याने या परीसरातील महामार्गावर दिवसातून तीन वेळेस पाणी शिंपडण्याची मागणी नागरिकांन कडून करण्यात येत आहे.
………………………………………………………………………………………..
    *अजिंठा घाट ते हुतात्मा स्मारक फर्दापूर पर्यंत दरोज वाहतुककोंडी*
महामार्ग चौपदरीकरनाच्या कामात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अजिंठा घाटाकडे चक्क दुर्लक्ष झाले आहे मागील तीन वर्षात घाटातील महामार्गांची एकदाही डागडुजी न झाल्याने घाटात मोठमोठे खड्डे पडून रस्ता नावालाच उरला आहे,परीणामी अजिंठा घाट ते हुतात्मा स्मारक फर्दापूर पर्यंत दरोज वाहतूककोंडी होत असून हे सात किमीचे अंतर कापण्यासाठी वाहन धारकांना एक ते दिड तासांचा वेळ वाया घालावा लागत आहे दरम्यान मागील आठवड्यात घाटातील खड्यांन मुळे ट्रकचा अपघात होवून एका ट्रक चालकाला त्याचा जीव गमवावा लागला होता दरम्यान याबाबीची दखल घेऊन अजिंठा घाट ते हुतात्मा स्मारक फर्दापूर पर्यंतची महामार्ग बांधणी त्वरित करण्याची नागरीकांन कडून करण्यात येत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close