Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

महिलांनी नाविन्यपूर्ण उद्योगांकडे कल वाढवावा – आमदार अंबादास दानवे

संभाजीनगर- जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली बैठकीत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला यात प्रामुख्याने मनपा मार्फत कंपन्यांसाठी लागणारे कुशल महिला व मुली कामगार यांना प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीवर लावणे, मनपाच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना १०,००० (दहा हजार )रुपये प्राथमिक कर्ज मिळणार असून त्याची रितसर परतफेड केल्यास आणखीन वाढीव कर्ज मिळत राहणार त्याची नोंदणी सेतू सुविधा केंद्र मार्फत सुरू आहे त्याचप्रमाणे विविध योजनेत महिला बचत गटांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानाविषयी माहिती घेण्यात आली या सर्व योजनांची सविस्तर माहिती राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक सुरेंद्र पाटील व व्यवस्थापक श्री भरत मोरे यांनी दिली यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी श्री डोके कार्यक्रम अधिकारी चंद्रशेखर हिंगोले यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बैठकीत बोलताना आमदार अंबादास दानवे म्हणाले की सध्याच्या स्पर्धात्मक युगात महिलांनी बचत गट किंवा इतर योजनांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानावर जास्त वेळअवलंबून न राहता आपल्या कार्यकुशलतेवर नाविन्यपूर्ण उद्योगांकडे आपला कल वाढावावा. याप्रसंगी आजच्या बैठकीत शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सुनिता देव उपजिल्हा संघटक प्रतिभा जगताप शहर संघटक प्राजक्ता राजपूत आशा दातार विद्या अग्निहोत्री नगरसेविका मनिषाताई लोखंडे जिल्हा युवती अधिकारी डॉ.अश्विनी जैस्वाल जिल्हा समन्वय अधिकारी निकिता बरतूने उपशहर प्रमुख नगरसेवक मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब दानवे ,विनोद लोखंडे शिवसेना प्रसिद्धीप्रमुख अभिजीत पगारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close