Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

वोक्हार्ड ग्लोबल स्कूलतर्फे जागतिक आयबी शिक्षणाचा राजमार्ग खुला

mh20live Netowrk

वोक्हार्ड ग्लोबल स्कूल, औरंगाबादतर्फे कळविण्यात येते की वोक्हार्ड स्कूलला इंटरनॅशनल बॅकलॉरेट (IB) डिप्लोमा प्रोग्रॅम संचालित करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे.वोक्हार्ड ग्लोबल स्कूल, २०१६ साली केवळ १६  नर्सरीतील विध्यार्थ्यांना घेऊन आपल्या प्रवासाची सुरुवात केली. गेल्या ३ वर्षात शाळेने भरधाव प्रगती केली आहे. वोक्हार्ड ग्लोबल स्कूल मराठावाड्यातील  सर्वात वेगवान प्रगती करणारी शाळा ठरली आहे. जागतिक दर्जाचा अभ्यासक्रम राबवणारी ही शाळा, २०१६ साली वोक्हार्ड ग्रुप चे संस्थापक व अध्यक्ष  डॉ. हाबिल खोराकीवाला  हयांच्याद्वारे स्थापन करण्यात आली होती. १६ ते १९ वर्ष ह्या वयोगटातील मुलांकरिता डिप्लोमा प्रोग्रॅम संचालनासाठी वोक्हार्ड स्कूलला अधिकृत मान्यता मिळाली आहे. प्रायमरी प्रोग्रॅम (३ – ११ वर्ष) आणि मिडल इयर्स प्रोग्रॅम (११-१६ वर्ष) या करिता शाळा आधीच  मान्यताप्राप्त आहे. डिप्लोमा प्रोग्रॅमच्या मान्यतेनंतर वोक्हार्ड स्कूल आयबी कंटिन्युअम (संपूर्ण आय बी अभ्यासक्रम) चालवू शकते. अशा प्रकारची ही देशातील ३७ वी शाळा आहे.  

      इंटरनॅशनल बॅकलॉरेट ऑर्गनायझेशन (IBO) ही जगातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून, ३ ते १९ वर्षापर्यन्तच्या मुलांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम चालवते. आयबी परिवारात १५० देशातील ५००० हून धिक शाळा समाविष्ट आहेत. 

आयबीओ च्या मान्यतेसाठी शाळेने अथक परिश्रम घेतले आहेत. PYP, MYP आणि DP हे तिन्ही कार्यक्रम संचालित करणारी, वोकहार्ड ग्लोबल स्कूल देशातील ३७ वी आणि मराठवाड्यातील पहिली शाळा आहे.

डिप्लोमा प्रोग्रॅमचे समन्वयक श्री निर्मलेन्दु त्रिपाठी सांगतात, “वोक्हार्ड शाळेतील शिक्षकगण व त्यांचा प्रदीर्घ अनुभव, आम्हाला शाळेत पोषक वातावरण निर्माण करण्यास कारणीभूत ठरला आहे. त्यामुळेच शाळेची मूल्ये आय बी च्या कठोर निकषास पात्र ठरली आहे.” 

प्राचार्य श्री प्रदीप शर्मा सांगतात “मला अतिशय आनंद आहे की फार कमी वेळात वोक्हार्ड शाळेने तिन्ही आय बी कार्यक्रमांची मान्यता प्राप्त केली आहे. जागतिक पातळीवर आय बी अभ्यासक्रम सर्वोत्कृष्ट मानला जातो. मला अभिमान आहे की आम्ही विद्यार्थ्यांसाठी प्रेरक आणि पोषक निर्माण करू शकलो. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणे हेच आमचे कर्तव्य आहे.”    

वोक्हार्ड शाळा हे जाहीर करू इच्छिते की येत्या शैक्षणिक सत्रापासून १४ वर्ष व अधिक वयाच्या विद्यार्थ्यांकरिता निवासी सुविधा उपलब्ध कारण्यात येतील. ह्यामुळे मराठवाड्यातील सर्व विद्यार्थ्यांना आयबी शिक्षणाचे दरवाजे खुले होतील. अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण असे आहे विद्यार्थी वसतिगृह मुले आणि मुली दोघांसाठीही उपलब्ध असेल. वसतिगृह पूर्णपणे वातानुकूलित असून, एका खोलीत चार विद्यार्थी राहू शकतील.

सद्यपरिस्तिथीत शाळा औरंगाबाद शहराच्या सर्व भागांत बस सुविधा पुरवते. २०२०-२१ या सत्रापासून शाळेकडून जालना शहरापर्यंत बस सुविधा पुरविण्यात येईल. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close