Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

औरंगाबाद :साक्षी, सम्यक वेगवान धावपटू 

औरंगाबाद जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हा कुमार गट निवड चाचणी स्पर्धेत मुले व मुलींच्या गटात साक्षी चव्हाण आणि सम्यक गायकवाडने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम स्थान मिळवतांना ‘वेगवान धावपटू’ चा मान मिळविला.  

मिलिंद कॉलेजच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात संपर्ण झालेल्या या स्पर्धेत शंभर मीटर धावण्याची शर्यत मुलींच्या गटात साक्षी चव्हाणने १२.४ सेकंदात तर मुलांमध्ये मध्ये सम्यक गायकवाडने हि शर्यत ११.३ सेकंद अशी वेळ देत ‘वेगवान धावपटू’ चा मान मिळविला. या स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष मा.आ.श्रीकांत जोशी यांच्या हस्ते झाले.  
निकाल असे :
१४ वर्षाखालील(मुली/ मुलं)-तन्वी कानाडे, सिया पायगुडे, तनिष्का पवार, लोकेश नवगिरे, वरद लिंगसे. १६ वर्षाखालील(मुली/ मुलं)-मुसधिक खातीब, आदित्य ढाकणे, तेजस ठाकरे, कैसर खान, साक्षी चव्हाण, ऋषीप्रसाद देसाई, बलराज परदेशी, कुपूद्दीन काद्री, महेश मिसाळ, मेहविश शेख, राज मडके, रोशनी मज्जी, वैभव तगारे, प्रियांका ओकसा, ओंकार वणवे, सुहानी खोब्रागडे. १८ वर्षाखालील(मुली/ मुलं)– सलीम पठाण, राहुल काजळे, सुनील रामने, ज्ञानेश्वर राठोड, दीप्ती लिमन, निकिता मोरे, सम्यक गायकवाड, सागर वालतुरे, श्रावणी ननावरे, गायत्री सुरासे, शुभम आव्हाड, अजिंक्य आव्हाड, सानिया जाधव, स्नेहल त्रिभुवन, संचिता मोरे, हर्षल जंगले, उजमा खान, आदित्य गायकवाड, चैतन्य शेळके, कल्पना माडकमी, आरती सातदिवे, वित्तल शेलार. २० वर्षाखालील(मुली/ मुलं)– किशोर तामखने, फरहान खुरेशी, अनिल आघाडे, प्रतीक जाधव, अल्ताफ शेख, धनश्री माने, ऋषभ शिंदे, ज्ञानेश्वर जाधव, सचिन घोडे, रोहित खैरे, कृष्णा ठोंबरे, ऋषिकेश घाटगे, संद्याराणी सावंत, नेहा फुफने, संकेत मदने, महेश काथार. स्पर्धेत जिल्हा संघटनेचे सचिव डॉ.फुलचंद सलामपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल निळे, वाहिद शेख, प्रदीप अंभोरे, महादेव उबाळे यांनी पंच म्हणून कामगिरी केली.

सर्व विजयी खेळाडू पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांच्या पुढील वाटचाली करिता महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे सहसचिव पंकज भारसाखळे, ज़िल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.रंजन बडवणे, उपाध्यक्ष शशिकला निळवंत आणि कोषाध्यक्ष मोहन मिसाळ यांनी शुभेछया दिल्या आहेत.    

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close