Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

चांगल्या संस्कार बरोबर, चांगली संतती कमवा नक्कीच आपला जीवन सुखकर होईल- ह.भ.प.निवृत्ती महाराज वाडेकर

करमाड/ सुदाम पठाडे mh20live Network


आजकालच्या विज्ञान युगामध्ये विज्ञानाने प्रगती भरपूर केली मात्र संस्कार नावाची गोष्ट लोकपावत चालली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं त्यासाठी शपथ घेतली याचं कारण म्हणजे जिजामातांनी फक्त संपत्तीला महत्त्व दिले नसून चांगल्या संपत्तीला महत्त्व दिले त्यामुळेच हिंदवी स्वराज्य आपल्याला बघायला मिळालं आणि आताच्या काळातील सोळा वर्षाचा पोरगा गाणं म्हणतो सोळावं वरीस धोक्याचं त्यामुळेच आपण आपल्या भावी पिढीला चांगले संस्कार बरोबर चांगली संतती कमवावी त्यांना चांगले संस्कार द्या नक्कीच आपला जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन ह.भ.प. निवृत्ती महाराज वाडेकर औरंगाबाद तालुक्यातील भालगाव येथील चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील किर्तनात ते बोलत होते. यावेळी गायनाचार्य गणेश महाराज ह.भ.प कल्याण महाराज जायभाय, संगीत विशारद गणेश महाराज देवकर, मृदंगाचार्य गणेश महाराज चौधरी, व उद्धव डिघुळे, हरिभाऊ डीघुळे, विक्रम आप्पा, भाऊसाहेब नाब्दे, सुभाष डिघुळे, अशोक कदम, दादा पाटील डोईफोडे व समस्त गावकरी मंडळी भालगाव व आदी उपस्थित होते.यावेळी भालगाव ग्रामस्थां यांच्या वतीने हभप. निवृत्ती महाराज वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला पुढे बोलताना ते म्हणाले योग्य संस्कार अभावी भावी पिढीची घडी कोठेतरी बिघडत चालली आहे त्यामुळे समाजात व्यसनाधीनतेचे प्रमाण देखील वाढले आहे. यासाठी आईवडिलांनी देखील आपल्या मुलांना लहान वयातच योग्य संस्कार घडवणे गरजेचे आहे तुमच्या मुलाला मोठ्या साहेब नाही बनवला तरी चालेल मात्र त्याला समाजाच्या लायक असणारा माणूस नक्कीच बनवा असा उपदेश त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
लहान मुलांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा लहान मुलांच्या हातात जर ज्ञानेश्वरी, गीता, रामायण, महाभारत, भागवत, गाथा हे ग्रंथ दिले तर नक्कीच त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जर आपल्या मुलाला लहान वयातच परमार्थात घेऊन आलो नाही तर तुम्हाला ते म्हातारपणी वृद्धाश्रमात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही असे देखील यावेळी ते म्हणाले.
यावेळी समस्त गावकरी मंडळी बालगाव व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close