Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

शाहिद कपूर तिसऱ्यांदा होणार बाबा? पत्नीने दिली अशी रिअ‍ॅक्शन

मुंबई : : बॉलिवूडचा हँडसम हंक शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा यांचा सुखाचा संसार सुरू आहे. शाहीद आणि मीराचं लग्न 2015 मध्ये झालं. लग्नानंतर एका वर्षात शाहीदच्या घरी मीशा नावाची परी जन्माला आली. त्यानंतर 2018 मध्ये शाहीदला पुत्ररत्न प्राप्त झालं. शाहीद जसा त्याच्या नवनव्या सिनेमांमुळे चर्चेत असतो तशीच त्याची पत्नी मीरादेखील नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. मीरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. काही दिवसांपासून मीरा आणि शाहीद तिसऱ्यांदा आई – बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या सोशनच्या माध्यमातून चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. या सेशन दरम्यान एका युजरने मिराला असा प्रश्न विचारला ज्यामुळे तिला आश्चर्याचा धक्का बसला.
च्या माध्यमातून चाहत्यांनी मिराला तिच्या आवडत्या पदार्थासोबतच तिच्या आवडत्या हॉलिडे डेस्टिनेशन्सबद्दल प्रश्न विचारले. यावर मिराने देखील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. याच दरम्यान एका युजरने तिला तू तिसऱ्यांदा गरोदर आहेस का.. असा प्रश्न विचारला.

यावर मिराने नाही म्हणून उत्तर दिले. शिवाय हसण्याचा इमोजी देखील पाठवला आहे. त्यानंतर दुसऱ्या चाहत्याने तू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेस का.. असा प्रश्न विचारल. यावर तिने नाही म्हणून उत्तर दिले आहे.
सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर मिराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एका अभिनेत्रीप्रमाणे तिच्या चाहत्यांची संख्या आहे. मिरा आणि शाहीदला २ मुलं आहेत. त्यांना ४ वर्षांची मुलगी मिशा आणि २ वर्षांचा मुलगा झैन आहे. २०१५मध्ये त्यांचं लग्न झालं होतं.

मीराने नुकतंच इन्स्टाग्राम लाइव्ह केलं. त्यामध्ये तिच्या फॅन्सच्या प्रश्नांची तिने मनमोकळी उत्तरं दिली. काही लोकांनी तिला तिच्या प्रेग्नंसीबद्दल विचारलं त्यावेळी मीराने याही प्रश्नचं उत्तर दिलं. मीरा म्हणाली, ‘मला माहित नाही या सगळ्या चर्चा कुठून सुरू झाल्या. पण सध्यातरी अशी काही बातमी आमच्याकडे नाहीये.

https://www.instagram.com/shahidkapoor/?utm_source=ig_embed
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close