Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी ओबीसींचं आरक्षण काढणार का? मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई: मराठा आरक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानात विरोधी पक्षानं सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. मराठा आरक्षणावरून विरोधकांनी सरकारवर अनेक आरोप केले. मात्र, सर्व आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोडून काढले.

सभागृहाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी चौफेर फटकेबाजी केली. मराठा आरक्षणासाठी ओबीसींचं आरक्षण काढणार का? यावर देखील उत्तर देऊन विरोधकांना गप्प केलं.

मराठा समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देताना दुसऱ्या समाजाचा आम्ही एक कणही काढणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले, राज्यात सध्या आरक्षणाचा विषय संवेदनशील आहे. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागेल तो लागेल. पण मागील वेळी आपण निर्णय घेतला होता, तेव्हा आपण सगळे एकत्र होतो. उच्च न्यायालयात आपण केस जिंकलो. नंतर सर्वोच्च न्यायालयात आपण गेलो तेव्हा वकिलांची फौज तशीच्या तशी ठेवली आहे. सरकारनं भूमिकाही बदलली नाही. वेळोवेळी मराठा संघटनांसोबत चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण तर अनेक वेळा वकीलांबरोबर कायम चर्चा करत आहेत. सर्वानुमते ही लढाई आपण तिथे लढतो आहे. ही लढाई जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही. ही लढाई जिंकावी, अशी माझी प्रार्थना आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, ही लढाई सुरू असताना ओबीसींचं आरक्षण काढणार का? हे मध्येच कुणाच्या सडक्या डोक्यातून निघालं माहीत नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

ज्या कोणी समाजविघातक शक्ती जातीपातीत संघर्ष आग लावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या आगीवर पाणी टाकावं लागलं. आपण टाकलं नाही तर राज्यातील जनता पाणी टाकेल, असंही मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close