Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

”कशाला बोलता, अनेकवेळा डिपॉझिट जप्त” : शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

सातारा : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या जहरी टीकेवर अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं. सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी “गोपीचंद पडळकरांना काही महत्व देण्याची गरज नाही, त्यांचं अनेकवेळा डिपॉझिट जप्त केले आहे, कशाला बोलायचं” असं म्हणत टोलेबाजी केली. याशिवाय देवेंद्र फडणवीस हे काहीही बोलून प्रसिद्ध मिळवत आहेत, असं म्हणत त्यांनी फडणवीसांच्या मुलाखतीतील गौप्यस्फोटावर तिरकस निशाणा साधला.

यावेळी ते म्हणाले की, संरक्षण मंत्रालयावर आरोप करणं योग्य नाही. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आता राजकारण नको. भारत-चीन संघर्ष हा गंभीर मुद्दा आहे. मात्र भारत-चीन युध्द होण्यासारखी परिस्थिती नाही. तो रस्ता आपला आहे. चीनने रस्त्यावर अतिक्रमण केलं. तिथं फायरिंग न करण्याचा करार आहे. शरद पवार यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम सर्व गोष्टींवर होत आहे. लॉकडाऊनमुळे लोक बोलत नाहीत. त्याचा हे फायदा घेत आहे. लोकांच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतला जातोय. अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची आता गरज आहे, असं पवार म्हणाले.

ते म्हणाले की, कारखाने सुरू न होणे हे देशासाठी चिंताजनक बाब आहे. टॅक्सेस वर मोठा परिणाम झालाआहे. यामुळं राज्य सरकारच्या वेतनावर परिणाम झाला. आजपर्यंतच्या इतिहासात हे पहिल्यांदा झाले. अन्य राज्याच्या तुलनेत आपले राज्य चांगले होते पण अशा परिस्थितीत संपूर्ण अर्थव्यवस्था संकटात आली आहे.

पवार म्हणाले की, भारत-चीन युद्ध होईल असं वाटत नाही. त्यांनी खुरापत काढली. तिथला रस्ता आपण काढतोय तो आपल्या हद्दीत आहे. सियाचिन आपला भाग आहे. म्हणून तो रस्ता केला आहे. त्यांची लोक रस्त्यावर येतात म्हणून धर पकड सुरु आहे. 1993 साली हिमालय बॉर्डर वर सैन्य कमी करण्याचा निर्णय झाला होता. नरसिंग रावांनी करार केला होता. दोन्ही देशानी बंदुकीचा वापर करायचा नाही असा करार झाला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close