Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

गोरगरिबांच्या पैशांवर डल्ला मारायला जाताना लाज नाही का वाटली ? – आमदार बाळाराम पाटील

पनवेल / राज भंडारी 

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका हद्दीतील कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल, पूर्व /पश्चिम, तळोजे या सिडको निर्मित वसाहतीतील गृह निर्माण संस्था व घरमालक संघटना यांना ऑक्टोबर २०१६ ते २०२१ पर्यंत जाचक मालमत्ता कर (घरपट्टी) भरण्याबाबतचा ठराव पनवेल महानगरपालिकेने मंजुर केला आहे. मात्र सदर वसाहतीतील गृहप्रकल्प हे सिडकोच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. अद्यापही सिडकोमार्फत दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचा आभाव याठिकाणी असून सिडकोमार्फत वसाहती या पूर्णपणे महानगरपालिकेकडे हस्तांतर झालेल्या नसल्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या या निर्णयाविरोधात उद्रेक होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कळंबोली येथील सुधागड एज्यू.सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयात शनिवारी सायंकाळी शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भीमशक्ती, समाजवादी पक्ष या महाविकास आघाडीच्यावतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. 
सिडको महामंडळाने निर्मिती केलेल्या वसाहतीतील नागरिक सिडकोकडे सेवाकर (Service Charges)वपाणी बिल भरत आहेत. तसेच विद्युत वीज बिल वितरण कंपनीकडे भरले जाते. आज अखेरपर्यंत दिल्या जाणा-या मुलभुत सुविधा उदा. रस्ते, आरोग्य, विज,पाणी, उद्याने,गटारे इ. सिडको महामंडळाकडून दिल्या जात आहे. आजपर्यंत पनवेल महानगरपालिकेने सिडको निर्मिती वसाहतीमध्ये घनकचरा व्यवस्थापन वगळून कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा दिलेल्या नाहीत. तसेच सदर वसाहती पूर्णपणे महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झालेल्या नाहीत त्यामुळे जोपर्यंत पूर्णपणे हस्तांतर होत नाही तोपर्यंत पनवेल महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचा कर घेवू नये, असा सूर यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पालिका प्रशासनावर लगावला. 
या निषेध सभेसाठी कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उप जिल्हाप्रमुख रामदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, काँग्रेसचे पनवेल तालुका अध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक रवींद्र भगत, गोपाळ भगत आदींसह महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक आणि कळंबोलीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी तसेच महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वी पुढील ५ वर्षे कोणत्याही स्वरूपाचा कर लादला जाणार नाही. असे आश्वासन देणा-या प्रशासनाला व सत्ताधा-यांना जाग आणण्यासाठी मालमत्ता कर (घरपट्टी) या जाचक करांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने जाहीर या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close