Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

हनिमून झाल्यानंतर नवरा बायको मध्ये का होतात भांडणं? समजून घ्या खरे कारण !


सध्या लग्नांचा सीजन चालू आहे. पंचविशीतल्या अनेक तरुणांनी वा तरुणींनी आपला जोडीदार आधीच निवडला आहे आणि लवकरच ते लग्न करतील किंवा करूनही झालं असेल. त्यानंतर हनिमून चे प्लान्स तयार होतील आणि मग दोन्ही जोडीदार आपल्या लग्नानंतरच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात करतील. पण ह्या खऱ्या आयुष्यातच त्यांची एकमेकांशी जुळवून घेण्याची कसोटी लागेल आणि त्यांना कळून चुकेल कि आपल्या जोडीदाराबरोबर आयुष्यभराचा संसार करणं इतकं सोप्पं नसतं. कारण ह्या हनिमून नंतरच जोडीदारामध्ये भांडणं होण्यास सुरुवात झालेली असते. काय असतात ह्या भांडणांची कारणे? कशा प्रकारे आपण आपल्या जोडीदाराशी जुळवून घेऊ शकतो? वाचूया ह्या लेखात.

एकदा का लग्न झालं कि आपण एकमेकांना डेट करण्याच्या फेज मधून बाहेर आलेलो असतो. लग्न नंतर डेटिंग चा पडदा साफ उतरलेला असतो आणि खरा चेहरा समोर आलेला असतो. मुलगी मुलाला इंप्रेस करण्यासाठी नटण बंद करते, चांगले कपडे घालून भेटायला येणं बंद झालेलं असतं. तसेच मुलाला सुद्धा लग्न झाल्यामुळे तिच्यासाठी आवडत्या गोष्टी करण्याची गरज वाटत नाही. दोघांमध्ये शारीरिक आकर्षण ही कमी झालेले असते.तिला वाटतं तो त्याची कर्तव्य पार पाडत नाही आहे आणि त्याला वाटतं ही सतत मला ब्लेम करते आहे. हा ब्लेम गेम रोजच चालू असतो आणि नात्या मध्ये दुरावा निर्माण व्हायला वेळ लागत नाही आणि त्यांचे रूपांतर भांडणांमध्ये होऊन विषय घटस्फोट घेण्यापर्यंत येतो. काही भांडणं आर्थिक कारणांवरून पण होतात. दोघांच्या घरची परिस्थिती वेगवेगळी असते आणि पैसे खर्च करण्याच्या बाबतीत दोघांचे विचार वेगवेगळे असू शकतात.

हे अनेकांच्या बाबतीत घडते आणि नॉर्मल ही आहे. सुखी जोड्या ह्यावर कुशलतेने मात करतात. त्यांना माहिती असतं कि काही गोष्टींमध्ये तडजोड आवश्यक असते आणि एकमेकांच्या मतांना विचारात घेऊन निर्णय घेण्यातच शहाणपण आहे जेणेकरून त्यांच्या मनात पुढे कोणतीही गैरसमज निर्माण होणार नाहीत. ते आर्थिक बाजू हाताळण्यासाठी दोघांपैकी एकाची निवड करून पैसे कुठे आणि कसे खर्च होतील ह्याचा प्लान बनवतात आणि त्या प्रमाणे कृतीतही उतरवतात.भांडणं होण्यापासून रोखण्यासाठी ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं आवश्यक असतं. काही जोड्या फक्त सहन करतात पण घटस्फोट घेण्याचा विचार करत नाहीत पण ह्यामुळे संसार सुखी होत नाही. सुखी संसारासाठी एकमेकांप्रती प्रेम जितकं आवश्यक असतं तितकंच वेळ देणं सुद्धा आवश्यक असतं जे लग्नानंतर कामाच्या रुटीन मध्ये शक्य होत नाही कारण ह्यावेळेला घरात उत्पन्नाचा वाटा सुद्धा द्यावा लागतो. आई बाबांच्या पैशांवर जगणं थांबलेलं असतं कारण दोघंही रिटायर झालेले असतात. कामाचं टेन्शन असतं ते वेगळंच. त्यामुळे एकमेकांना थोडासा का होईना पण दिवसातून थोडा वेळ देणं सुद्धा आवश्यक असते.भांडणं होण्यामध्ये मोठं कारण सेक्स ची अपूर्ण गरज हे ही ठरते ज्यावर कपल्स सर्रास दुर्लक्ष करतात. काहींना हवी ती उत्तेजना येत नाही आणि डॉक्टर कडे जाण्यास ही कमीपणा वाटतो. शारीरिक गरज न भागवल्यास प्रेम कमी होते, एकमेकांमधला संवाद कमी होतो. लग्ना अगोदर हे सर्व हवंहवंसं वाटतं पण लग्नानंतर सर्व बोरिंग वाटू लागतं कारण शारीरिक आकर्षण ही कमी झालेले असते. आपल्या दिसण्याकडे किंवा फिटनेस कडे कोणीही लक्ष देत नाहीत. अश्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास मोठी भांडण होण्या पासून रोखु शकतो आणि संसार सुखी बनवू शकतो. लेख आवडला असल्यास जरूर लाईक करून शेयर करा आणि तुम्हाला माहित असलेल्या नवीन वधू वरालाही नक्की वाचायला द्या.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close