Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करताना तुम्ही केवळ मतदारच…! 

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करताना तुम्ही केवळ मतदारच…! 

नुकतेच काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मुदत सम्पलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे 15 जानेवारी 2021 च्या मतदानानंतर नवीन ग्रामपंचायत स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. कुठे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सारखे तेच राहतील, नाहीतर नवीन चेहरे नवीन घडामोडी घेऊन येतील. सदस्यांचे भविष्य आजचा बहुमोल मूल्य असलेला मतदार निश्चित करेल. नन्तर तुमचे मूल्य होवो अगर न होवो, येत्या काही दिवसात नक्कीच होईल.

  ग्रामपंचायत हा कुठल्याही राजकीय सत्तेचा व पंचायत राजचा पाया आहे. परंतु,हा पाया हेवेदाव्यांनी कायम ढासळत चालला आहे. ज्यात मतदारांचे मूल्य हे मतदानापूरतेच होते. नन्तर तुम्ही कोण? आणि तुमची किंमतही कवडीमोलच!

  ही एक संधी म्हणून घ्या. संधी केवळ त्याच – त्या युत्या आणि आघाडीसाठी न देता, स्वतः एक उमेदवार म्हणून पुढे या! तुमच्यात योग्यता असेल तर ती तपासा आणि त्या योग्यतेची एकदा परीक्षा होऊच द्या! तुम्हालाही वाटेल मतदार म्हणून मी काही वाकड करू शकलो नाही, कदाचित उमेदवार म्हणून तरी माझे गाव व स्वतः ला बदलवू शकेल. एकदा दुसऱ्याचा झेंडा सोडून स्वतः चे निशाण उभारून पहा! निवडून येवो की न येवो नन्तर तुम्हीच विचार कराल, मी सुस्त न बसता एक प्रयत्न माझ्या गावासाठी केला.

  कसल्याही भानगडीत न पडता, जर तुम्ही मतदार म्हणूनच सरसावणार असाल, तर योग्य माणसाला निवडा. त्याची योग्यता ही त्याच्या कामावरून ठरवा. आणि त्याचे काम हे त्या व्यक्तीचे चमचे न सांगता त्याचे कर्तृत्वच सांगत असेल तर तोच तुमचा निवडीचा उमेदवार आहे हे ओळखा. गावात सदस्यांपेक्षा सरपंचाला महत्व असते. आणि हे महत्व काही कुठल्या व्यवस्थेने निर्माण केले नाही. ते तुम्ही आम्ही बाकीचे सदस्य केवळ बुजगावणे उभे केल्यामुळे झाले आहे. तुमची निवड सरपंचापर्यंत जात नसली तरी काही हरकत नाही. केवळ ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येऊ दया. निदान त्याच्या दमावर तो आपल्या वार्डाची ग्रामसभेत बाजू तर मांडेल, हे ध्यानात ठेवा.

  आज भावकी म्हणून खुप जण पुढे येतील. सगळे गावच यावेळेस भावकी व्हायला तयार होईल. ही भावकी भूत आणि वर्तमानात तशीच सारखी होती का? हे तपासा, आणि निर्णय पुन्हा विचार करून घ्या.

  सरपंचाचे काम गावात रस्ते, दिवा- बत्ती करणे इतके मर्यादित नसावे. अर्थात ते पण करणे आहेच. आपल्याला त्या व्यक्तीतला खरा माणूस शोधायचा आहे. जो एक गावकरी म्हणून, माणसातला शेजारी म्हणून सदैव तुमच्या पाठीशी राहील, त्याची बाजू उचलून धरा. उमेदवाराचे वागणे हे भेदभावाचे नसावे. जो न्यायी व्यक्ती तोच नेता आणि तोच तुमचा पुढारी.

  शेवटचं एक ध्यानात ठेवा! दोन- तीन गट विरोधात निवडणूका लढतीलही, पण नन्तर ते गळ्यात- गळे घालून फिरतात. तुम्ही आपसात डोके फोडून घ्याल नाहीतर मने दुरावून घ्याल. ग्रामपंचायतीची निवणूक असो की लोकसभेची मोजकेच उमेदवार भेदभावरहीत राजकारण खेळतात. तुम्ही जितके कमी लक्ष्य या बिनकामाच्या व्यर्थ बाबीत घालाल तितके चांगले. तुमचे काम योग्य उमेदवार योग्य जागी बसवणे आहे. आणि जागरूक मतदार म्हणून तुम्ही ते निश्चितच कराल. याची आशा नक्कीच करू!

लेखक- अमोल चंद्रशेखर भारती ( लेखक/ कवी / व्याख्याते, नांदेड )

मो – 8806721206

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close