Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

बिहारमध्ये पुढे काय होणार?; तेजस्वी यांच्याबाबत पवारांचे खूप मोठे विधान


पुणे:बिहार विधानसभा निवडणुकीत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपचे सर्व नेते प्रचारामध्ये होते तर दुसऱ्या बाजूला एक अनुभव नसलेला तरुण नेता निवडणूक लढवत होता, त्यामुळे तेजस्वी यादव यांना जेवढ्या काही जागा मिळताहेत ती त्यांची ‘अचीवमेंट’ म्हणावी लागेल. तेजस्वी यादव यांच्या या यशामुळे तरुणांना प्रेरणा मिळेल. इन्स्पिरेशन मिळेल आणि इतरांनाही मार्ग दिसेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांनी बिहार विधानसभा निवडणूक निकालांवर मतप्रदर्शन केलं.बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काही जागा लढवत होती. परंतु, तेजस्वी यादव यांना मदत व्हावी यासाठी आम्ही या निवडणुकीकडे फारसं लक्ष दिलं नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात पवार म्हणाले. बिहारमध्ये काँग्रेसच्या पदरी मोठं अपयश पडताना दिसत आहे. त्याबाबत विचारलं असता राजद आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटप कसं ठरलं होतं, याबद्दल मला माहिती नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलता येणार नाही, असे पवार म्हणाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close