Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षणलाईफ स्टाईल

आरोग्यदायी तीळाचे फायदे काय आहे ,जाणुन घ्या…

आरोग्यदायी तिळ

महाराष्ट्रामध्ये खरीप तसेच उन्हाळी हंगामात तिळाची लागवड केली जाते. तिळाचा मुख्य
उपयोग खाद्यतेंल तयार करण्यासाठी केला जातो. तिळाचा साबण, रंग, वनस्पती तूप, औषधी तेल
व सुगंधी तेल तयार करण्यासाठीही उपयोग होतो. तिळापासून चटणी व तिळगुळही तयार केला
जातो. तसेच स्निग्ध पदार्थ मिळतात. भारतातील लोकांचे सरासरी तेल खाण्याचे प्रमाण इतर
देशांच्या मानाने मात्र कमी आहे. त्यामुळे तिळाचे उत्पादन वाढवणे ही देशाची गरज आहे.
त्यासाठी योग्य जातींची निवड करणे, वेळेवर पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन, तिळाची काढ्णी
योग्य अवस्थेत करणे यासारख्या तंत्राचा वापर करून तिळाची लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात
होत असलेल्या तेलाची आयात करणे थांबेल व सर्वसामान्यांच्या आहारातील तेलाचे प्रमाणही
वाढेल. तिळामध्ये तेलाचे ५० टक्के आणि प्रथिनांचे २५ टक्के प्रमाण असून तेलामधे ज्वलनविरोधक
घटक सिसमोल, सिसॅंमोलीन आहेत. तेल दीर्घकाळ चांगले टिकते, खवट होत नाही, पेंडीत प्रथिने
३५ ते ४५ टक्के असतात तसेच कॅल्शियम, फॉस्फरसचे चांगले प्रमाण, पशू व कोंबडीसाठी पेंड उत्तम
खाद्य म्हणूनही वापर होतो. तिळात कॅल्शियम आहे, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. याशिवाय
मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत.
तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा
ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. . ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे , त्यांच्यासाठी तीळ फार
उपयोगी ठरतात. तिळातील लोह आणि कॉपर शरीरातील लोहाच्या अभिशोषणास मदत करते,
संधीवातासारख्या विकारांवर उपयुक्त ठरते. या गुणधर्मामुळेच तिळाचं तेल लावून मसाज केल्यानं
संधीवाताच्या रुग्णांना बरं वाटत असावं.


तिळात तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. तंतुमय पदार्थामुळे भूक कमी लागते, कारण
त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. वेट लॉसच्या डाएटमध्ये तुम्ही तिळाचा समावेश करू शकता.
एक चमचा तिळात साधारण ५० उष्मांक मिळतात, त्यामुळे ते प्रमाणातच घ्या. वजन कमी
करताना आपल्याला अनेक क्षार किंवा जीवनसत्वे कमी पडू न देणंही तितकंच महत्वाचं आहे,
त्यामुळे थोडे तीळ रोजच्या आहारात घेतल्यास त्यामुळे फायदाच होईल. तंतुमय पदार्थामुळे कोठा
साफ राहील. याचा फायदा मधुमेहींसाठी आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी होऊ शकतो.
यातील फायटोस्टिरोल्स नावाचे घटक रक्तातील वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करू करून कॅन्सरपासून

आपलं संरक्षण करतात. तिळाचं तेल स्वयंपाकासाठी वापरायलाही चांगलं आहे. त्यात मोनो आणि
पॉलि अनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत. या तेलातील सीसमोल आणि सिसमीन हे काही विशेष घटक
उत्तम अॅन्टी ऑक्सिडंट्स आहेत. यातील ऑलिक एसिड रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी
करायला मदत करते.तिळात जरी तेल आणि उष्मांक जास्त असले, तरीही काही प्रमाणात आपण
वर्षभर ते घेत राहिलो,

तर त्याचा फायदाच होईल. तिळाचं महत्व केवळ पदार्थाची चव, रंगरूप
वाढवण्यासाठी मर्यादित नसून त्याचा वापर पोषणमूल्यांसाठीही केला पाहिजे. तिळाची चटणी,
थालीपिठात वापर, किंवा तीळ सकाळी चावून खाणं, असा तिळाचा समावेश आपल्या रोजच्या
आहारात अवश्य करावा. साधारण १ ते २ चमचे तीळ रोज घ्यायला हरकत नाही. आपल्याला
आवश्यक ते जीवन सत्व आणि क्षार मिळावे म्हणून आपण कृत्रिम गोळ्या आणि व्हिटामिन्स घेतो.
त्यापेक्षा निसर्गानं दिलेल्या पदार्थांचा आपण आहारात समावेश केला तर? आपण स्वयंपाकामध्ये
वापरण्यासाठी पांढरे तीळ आणतो. औषधामध्ये मात्र काळे तीळ वापरावेत. रोज तीळ चावून
खाल्ल्यास शरीराचे बल वाढते. शिवाय दातही मजबूत होतात. मूळव्याधीच्या त्रासात रक्त पडत
असल्यास लोणी-खडीसाखर, नागकेशर यांच्यासमवेत तीळ सेवन केल्यास चांगला परिणाम होतो.
लहान मुलांना काहीवेळा अपचन होऊन पोट दुखते. अशा वेळी बेंबीच्या भोवती गोलाकार
तिळतेल चोळावे आणि गरम तव्यावर कापड गरम करून शेकावे. दुखणे लवकर कमी होते. आशा
आरोग्यदायी तिळाचा दैनदिन जीवनात वापर करणे आवश्यक आहे तसेच लागवड करणेही
फायद्याचे आहे .
डॉ.सुशिल सातपुते,
सहायक प्राध्यापक, एमजीएम,
नानासाहेब कदम कृषि महाविद्यालय ,
गांधेली, औरंगाबाद 9405733112

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close