Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

नांदेड :जिल्हातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – सभापती संजय अप्पा बेळगे


नायगाव ता/ शेषेराव कंधारे  

        नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना लग्नासाठी शासनाकडून जो काही निधी मिळतो तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करु आणि त्याचं बरोबर विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकामं सभापती संजय अप्पा बेळगे यांनी केले ते प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने जागतिक अपंग दिनाचे अवचित्य साधून दि.20 डिसेंबर रोजी नायगाव बाजार येथील अंबीका मंगल कार्यालयात दिव्यांग बांधवांचा रोजगार मेळावा, वधू वर परिचय मेळावा व रक्तदान शिबिर अशा त्रिसंगमी कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.     
      या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगर पंचायतीचे उपध्यक्ष विजय पाटील चव्हाण हे होते तर उध्दघाटन म्हणून शिक्षण व बांधकाम सभापती संजय माधवराव अप्पा बेळगे हे होते तर व्यासपिठावर नगरपंचायतचे गटनेते सुधाकर पा.शिंदे, 
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष  विठ्ठलराव देशमुख, डाॅ. प्रसाद बोराळकर, गणेश पा हांडे,प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव मंगणाळे,पंढरीनाथ हुंडेकर, विठ्ठलराव कदम, मारोती पुयड, मारोती मंगरुळे, चांदु अंबटवाड, सुनिल शिंदे, बाळासाहेब डाकोरे सह आदींची उपस्थिती होती. 
     प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने कोविड युध्दा म्हणून अनेक मान्यवर व्यक्तींचा सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी पत्रकार बाळासाहेब पांडे दै. पुण्यनगरी, गजानन चौधरी दै. देशोन्नती ,रामप्रसाद चन्नावार दै. श्रमिक एकजूट, शेषेराव कंधारे धुप्पेकर-दै.लोकपत्र-दलितवाणी,शंकर आडकीने लाईव्ह टीव्ही, माधव धडेकर दै. आदर्श गावकरी , अनिल कांबळे दै.लोकमत सर्कल प्रतिनिधीचा  सन्मानपत्र शाल ,श्रीफळ देऊन गौरविण्यात आले तर ग्रामसेवक माधुन प्रल्हाद गोरे, व्हि.बी. पाटील,आर.एन.  दमकोडवार सह आदी ग्रामसेवकांचा कोरोना युध्दा म्हणून सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले. 
      नायगाव बाजार येथील  अंबीका मंगल कार्यालयात दिव्यांग बांधवाचा वधु-वर परिचय मेळावा, रोजगार मेळावा तसेच महा रक्तदान शिबिर अशा त्रिसंगमी कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते. 
     दरम्यान महारक्तदान शिबिरात २७ रक्तदात्यांनी रक्तदान करुन इतरांना जीवदान देण्यासाठी मदत केली आहे तर वधू वर परिचय मेळाव्यात जवळपास ६० जनांनी नावं नोंदणी करून झाले असून सात दिव्यांग जोडप्यांचा विवाह जमला आहे.   रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेक उद्योग व्यवसायचे मार्गदर्शन करण्यात आले.प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नांदेड जिल्हा व नायगाव तालुक्याच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.  
कार्यक्रमाचे प्रास्तावना मुरलीधर गोडबोले यांनी केले तर सुत्रसंचालन चांदु अंबटवाड यांनी केले तर आभार साईनाथ बोईनवाड यांनी मानले. यावेळी जिल्हातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close