Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

आमच्यात वाद नाहीत, संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा…’

नामांतराच्या विषयावर शरद पवार यांनी केले भाष्य

मुंबई – औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत एकमत नसून परस्परविरोधी वक्तव्ये केली जात आहेत. काँग्रेस नामांतराला विरोध करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मात्र आपण वर्षानुवर्ष ही मागणी करत असल्याचे सांगून आपली ठाम भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना पटवून देऊ असे म्हटले होते. दरम्यान नामांतराच्या विषयावरुन सुरु असलेल्या वादावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

शरद पवारांनी सांगितले की, ‘आमच्यात वाद नाहीत. संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा, नाहीतर अजून काही म्हणा..या प्रकरणाकडे मी गांभीर्याने बघत नाही. त्यामुळे मी कधीही भाष्य केले नाही.’
मुख्यमंत्री कार्यालायच्या टि्वटर हँडलवर औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख केल्यानंतर हा वाद नव्याने निर्माण झाला होता. त्यातच आता उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
औरंगाबादच्या नामांतरावरून सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-काँग्रेसमध्ये धूसफूस सुरु आहे. शिवसेना नामांतरासाठी हट्ट धरत असून काँग्रेस नामांतरासाठी कडाडून विरोध करत आहे. नाव बदलणे हा शिवसेनाचा कार्यक्रम आहे, काँग्रेसचा नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close