Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

जायकवाडी धरणाच्या दोन दरवाजातून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात सोडले पाणी


पैठण / किरण काळे 

 महाराष्ट्र राज्याचे  रोहयो व फलोत्पादन मंत्री ना.संदिपान भुमरे यांच्या सुचने वरुन,जायकवाडी प्रकल्पाचे गेट क्रंमाक १७ व १८ या दोन दरवाजातून चनकवाडी,आपेगांव व हिरडपुरी बंधाऱ्यामध्ये आज दि.६ मे गुरुवार रोजी सकाळी ८:३० वाजता १०४८ क्युसेक प्रमाणे पाणी सोडण्यात आले. 
सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस अधिक वाढत असल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी तळाला गेली आहे.नदी काठावरील शेतकऱ्यांना व जनावरांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी टंचाई भासत असल्याने तालुक्यातील शेतकरी रोहयो मंत्री संदीपान पा.भुमरे यांच्या कडे सतत मागणी करत होते.त्यामुळे दिनांक २६ एप्रिल सोमवार रोजी ना.भुमरे यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांची भेट घेऊन जायकवाडी प्रकल्पातुन आपेगांव व हिरडपुरी या दोन्ही बंधाऱ्यात तात्काळ पाणी सोडण्यात यावे या करीता पत्र दिले होते.ना.संदिपान भुमरे यांंनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्राची तातडीने दखल घेऊन आज सकाळी साडेआठ वाजता जायकवाडी धरणाच्या दोन दरवाजातून आपेगांव,हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले.यावेळी  राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या मागणीनुसार तहसीलदार चंद्रकांत शेळके,स्विय सहायक नामदेव पा.खराद,जायकवाडी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता संदिप राठोड, तांबे,खरडकर आदी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close