Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

राज्यातील लसीकरण खरंच स्थगित करण्यात आलं? आरोग्य विभागाने केला महत्त्वपूर्ण खुलासा

मुंबई :केंद्र सरकारने फक्त कोरोना योद्धे,आरोग्य कर्मचारी,पोलीस,अग्निशमनदल,सफाई कामगार यांनाच नाही तर सर्वानाच कोरोना लस मोफत द्यावी अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.पंतप्रधान मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या मिटिंग मध्ये टोपे यांनी वरील मागणी केली.तसेच महाराष्ट्रातील कोरोना लसीकरण अभियान स्थगित नाही तर दोन दिवसासाठी संस्थगित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.    
      को-विन अ‌ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना लसीकरण अभियान दोन दिवस संस्थगित करण्यात आलेले आहे,१९ तारखेला पुन्हा लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल.लसीकरण स्थगित करण्यात आलेले नाही असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना लसीकरण उदघाटनानंतर स्थगित करण्यात आल्याच्या अफवा आहेत.लसीकरण अभियान स्थगित नाही तर संस्थगित करण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.लसीकरणाच्या संदर्भात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार को-विन या ऑनलाईन अ‌ॅपच्या माध्यमातून लाईव्ह नोंद व लसीकरणाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.मात्र या  अ‌ॅपमध्ये लाईव्ह ओपन होण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने आम्ही ऑफलाईन लसीकरण प्रक्रिया करण्याची मागणी केली.मात्र त्याला अनुमती मिळाली नाही.त्यामुळे आम्हाला लसीकरण प्रक्रिया तूर्तास संस्थगित करावी लागली.ती बंद किंवा स्थगित करण्यात आलेली नाही.१९ किंवा २० जानेवारीला लसीकरण सुरु होईल असे त्यांनी सांगितले आहे.दरम्यान केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोफत लस द्यावी अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close