Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

फोक्सवॅगन इंडियाच्या औरंगाबाद केंद्रातील उत्पादन पुन्हा सुरू

औरंगाबाद /mh20live Network

: स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) ने त्यांच्या औरंगाबाद येथील उत्पादन केंद्रातील उत्पादन आणि पुणे केंद्रातील इंडिया 2.0 प्रकल्पाच्या कामांना पुन्हा सुरुवात केली. स्थानिक प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडून सर्व आवश्यक त्या परवानग्या प्राप्त झाल्या असून या केंद्रांमधील उत्पादन क्रिया सुरू करण्यापूर्वी तेथे सर्वसमावेशक सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दोन्ही केंद्रांमध्ये सुस्पष्टपणे देण्यात आलेल्या सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून 60 कलमी उपाययोजनांची यादी करण्यात आली आहे.  वैद्यकीय तज्ञांच्या सहाय्याने ‘स्टार्ट सेफ’ एसओपी तयार करण्यात आली असून यामध्ये एसएव्हीडब्ल्यूआयपीएलच्या सर्व क्षेत्रातील कामांमध्ये सर्वसमावेशक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. 

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गुरप्रताप बोपराय म्हणाले की, “कोव्हिड-19 पश्चातील काळात काही नव्या आणि जुन्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या आशेने पुढे बघावे लागणार आहे. पुन्हा एकदा उत्पादन सुरू झाले की बाजारातील मागणी आणि ग्राहकांच्या गरजांचा आपण जास्त चांगल्या रितीने सामना करू शकू. ‘सुरक्षित उत्पादन आणि सुरक्षित कार्यालय संकल्पना’ विकसित करण्यासाठी आणि आमच्या कार्यात त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने गेल्या काही आठवड्यांपासून आम्ही सरकार, स्थानिक प्रशासन आणि आमचा वैद्यकीय टिम यांच्यासोबत अतिशय काळजीपूर्वक काम करत आहोत.”

औरंगाबाद येथील केंद्रातील उत्पादन सुरू करण्यात आले असून तेथे कमी कर्मचारी वर्ग एकाच पाळीत काम करत आहेत.  पुढील आठवड्यात अपेक्षित असणाऱ्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी या केंद्रात नव्या सुपर्बची निर्मिती वेळेआधीच पूर्ण होईल आणि इतर मॉडल्स आणि ब्रँड्सचा समावेश करण्यासाठी उत्पादन गतीला कालांतराने वेग येईल. पोर्ट्सचे कामकाज सुरळीत झाले आणि कर्मचारी वर्गाची संख्या सुधारत गेली की अंतर्गामी लॉजिस्टिक्सची कार्यकारी कार्यक्षमता आणि भागांची उपलब्धता यामुळे हळूहळू पूर्ण क्षमतेने उत्पादन वाढेल आणि सामान्य दैनंदिन कामे पुन्हा रुळावर येतील. 

 एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने त्यांच्या एसयुव्ही आधारित MQB A0 IN मंचावर केंद्रांच्या श्रेणीत सुधारणा, नव्या स्थापना आणि उत्पादन सुरु करण्याच्या (एसओपी) दिशेने विकास करून इंडिया 2.0 प्रकल्पाची तयारी पुन्हा सुरू कली आहे. भारतावर लक्ष केंद्रित करून, स्कोडा ऑटोने MQB-A0-IN मंच विकसित केला असून यावर स्कोडा ऑटो इंडिया आणि फोक्सवॅगन इंडियासाठी मॉडेल्सची निर्मिती करण्यात येणार आहे. स्कोडा व्हिजन इन आणि फोक्सवॅगन तैगुन संकल्पना अभ्यासाचे प्रदर्शन दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये करण्यात आले. या मंचाअंतर्गत निर्मिती करण्यात आलेली ही पहिली वाहने आहेत.   

60 कलमी स्टार्ट सेफ एसओपी- एसएव्हीडब्ल्यूआयपीएलमधील सुरक्षा उपाययोजना

नव्याने सुरक्षित सुरुवात करण्याच्या दृष्टीने एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने 60 कलमी विस्तारीत एसओपीचा अवलंब केला आहे.  यामध्ये सुरक्षित अंतर आणि स्वछता याबाबत विशिष्ट नियमावलींचा समावेश करण्यात आला आहे.  उदाहरणार्थ, कार्यालयात कामाला येण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी दररोज सकाळी घरीच त्यांचा ताप बघणे आणि 6 कलमी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. प्रवासात आणि कामाच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. चालताना आणि कार्यालयात प्रवेश करताना तसेच बाहेर जाताना सुरक्षित अंतर राखता यावे यासाठी जमिनीवर अनेक ठिकाणी सुरक्षित अंतराच्या खुणा करण्यात आल्या आहेत. उत्पादन कर्मचाऱ्यांसाठी विशेष पद्धतीचे चेहरा झाकण्याचे आवरण तयार करण्यात आले असून उत्पादन प्रक्रियेच्या वेळी ज्या ठिकाणी किमान 1.5 मीटरचे सुरक्षित अंतर राखणे शक्य नसेल त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी या शील्डचा वापर करणे अनिवार्य आहे. 

वैयक्तिक संपर्क आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी उत्पादन कर्मचाऱ्यांनी छोट्या समूहात काम करणे, आभासी (व्हर्च्युअल) प्रशिक्षणाचा अवलंब, एकाच उपकरणाचा अनेकांनी वापर करण्यावर निर्बंध आणि ग्लव्ह्जचा अनिवार्य वापर यासारख्या इतर उपाय योजना करण्यात आल्या आहेत. जिथे शक्य असेल तिथे कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्यासाठी उत्तेजन दिले जात आहे.  गर्भवती महिला आणि जुने आजार असणाऱ्या सहका-यांना जास्त काळासाठी घरूनच काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  

या खबरदारीच्या उपाययोजनांसोबतच सामान्य सावधगिरीचे उपाय आणि स्वछता सूचनांचे – उदा. वाढीव स्वच्छता, स्पर्श विरहित स्वच्छता ठिकाणे आणि एकमेकांशी हस्तांदोलन करण्यापासून परावृत्त करण्यासाठी, सुरक्षित अंतर राखण्यासंदर्भात, सतत हात धुणे आणि निर्जंतुक करणे यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी जागरुकता सत्र घेतली जात असून आपात्कालीन संपर्क यादीचे वाटप करण्यात आले आहे.  या सुरक्षेच्या उपाययोजनांसोबतच रुग्ण शोधू शकणारे आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मदतीचे असणारे ‘आरोग्य सेतू’ ॲप डाउनलोड करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close