Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांना दत्तक घेणार – आ. राजेश पवार यांची घोषणा


नायगाव ता./ शेषेराव कंधारे
ग्रामपंचायतीची सत्ता हाती घेण्यासाठी गाव पुढाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले असताना या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजपचे आ. राजेश पवार यांनी त्यांच्या नायगांव मतदारसंघात अभिनव योजना राबवली आहे. ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होईल ते गाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी विकासाच्या वेगवेगळ्या योजना राबवण्याचा संकल्प आ.राजेश पवार यांनी केला आहे. आ.पवार यांची ही संकल्पना गावातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी हि योजना राबविण्यात असून त्यांच्या या संकल्पनेचा अनेक गावात ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी बैठका घेतल्या जात असुन तालुक्यात चागंला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
नायगाव तालुक्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वजिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून मतदान १५ जानेवारी रोजी ला होणार आहे. नायगाव मतदार संघातील मुद्दत संपलेल्या ६८ ग्रामपंचायतीनी गावात एकोपा टिकविण्यासाठी व आपसातील मतभेद टाळण्यासाठी व गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्राम पंचायती बिनविरोध काढाव्यात असे आहावान नायगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार राजेश पवार यांनी केले आहे.
मतदार संघातील ग्राम पंचायती बिनविरोध काढल्यास त्या बिनविरोध निघालेल्या ग्राम पंचायतीना गावाच्या सर्व सार्वजनिक विकस कामे पुर्ण करुन देण्याची हमी आमदार राजेश पवार यांनी घेतली यात दत्तक गाव योजना मध्ये प्राधान्य देऊन गाव सर्व सोययुक्त गाव सुधारूण देण्याची हमी घेतली आहे. प्रत्येक गावात शंभर टक्के च्या जवळ सर्व छोटे मोठे शेतकरी आहेत.त्या शेतक-यांना त्यांच्या शेताता जाण्यासाठी रस्ता नसतो.शेतातील माल घरा पर्यंत पोहचविण्यासाठी कसरत करावी लागते ऐवढेच नाही तर ज्या शेतक-याकडे सिंचनाची सोय आहे केळी, ऊस व फळबाग घेयाचे पण तो माल बाजारा पर्यंत पोहच्यासाठी पादन रस्ते नसेल तर त्यांची मोठी अडचण होणार आहे. म्हणून गावातील पुर्ण पणे अगोदर पादंन रस्ते करुन दिल्या जातील. गावातील अंतर्गत रस्ते,शासनाच्या प्रत्येक सरकारी योजना येणा-या त्या सरकारी योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतक-यां पर्यंत पोहचविण्यासाठी विशेष मोहिम हाती घेऊ,स्मशान भुमीसाठी गायरान जागा उपलब्ध करुन देऊन स्मशान भुमीसाठी शेडसाठी निधी उपलब्ध करुन देऊ, गावात आरोग्य मेळावे घेण्यात येईल गावातील जिल्हा परिषद शाळा विकास कार्यक्रम हाती घेऊ गावाला विकास दिशेच्या वाटेवर घेऊन जाऊ हे सर्व कामे बिनविरोध निघालेल्या ग्राम पंचायतीना मिळणार आहे असे या भागाचे आमदार राजेश पवार यांनी आहावान केले.आपले गाव बिनविरोध निघाल्याने गावा मध्ये शांतता व बंधुभावाचे सौहार्द कायम टिकुन राहिल व गावाचा सर्वांगीण विकास होईल असेही आ.राजेश पवार यांनी म्हटले आहे. कोरोना महामारीच्या संकटात व्यस्त असलेल्या प्रशासनावर चा ताण ही कमी होणार आहे.गावा गावातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेऊन मतदार संघातील ग्राम पंचायती बिनविरोध काढुन गावचा सर्वागिन विकास साधण्याचे आहावान आ.राजेश पवार यांनी केले आहे. ज्या ग्राम पंचायती बिनविरोध निघतील त्या गावांना विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे आ.पवार सांगितले. तसे आमदार राजेश पवार व जिल्हा परिषद सदस्या पुनमताई पवार यांनी तसे गावा गावात भेटी अंती गावात सर्व नागरिकांना संवाद साधला तेव्हा त्यांनी तुमचे गाव पुढे येणा-या ग्राम पंचायत मध्ये बिनविरोध गाव काढा गावाच्या सार्वजनिक विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे ग्वाही तशी दिले होते.तसे ब -याच गावातील नागरिकांना सकारात्मक चर्चा ही केली होती.तसे आम्ही ब-याच ग्राम पंचायत समितीया बिनविरोध काढल्या जातील असे आ.राजेश पवार व जिल्हा परिषद सदस्या पूनम पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close