Subscribe to our Newsletter
औरंगाबाद

ग्रामविकास अधिकारी जिजाभाऊ मिसाळ यांच्या स्वखर्चातुन बालानगर प्रा.आ.केंद्रास औषधींची मदत

पैठण / प्रतिनीधी ग्रुप ग्रामपंचायत बालानगरचे ग्रामविकास अधिकारी जिजाभाऊ मिसाळ यांनी स्वखर्चातुन बालानगर (ता.पैठण) येथिल प्राथमीक आरोग्य केंद्रास औषधी उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.ग्रामपंचायत बालानगर येथे कार्यरत असलेले व संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली जन्मभुमी आपेगाव येथील रहिवासी जिजाभाऊ मिसाळ हे ग्रामविकास अधिकारी म्हणुन बालानगर ग्रामपंचायत येथे कार्यरत आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोणा कालावधित अल्पशी मदत म्हणुन खोकल्यावरिल औषधाच्या 175 बाँटल त्यांनी डॉ.मणियार यांच्याकडे मदत म्हणुन सुपुर्द केल्या.याविषयी अधिक बोलतांना ग्रामविकास अधिकारी जिजाभाऊ मिसाळ म्हणाले की,कोरोणा सुरु झाल्यापासून सतत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपर्कात आहे.सहज चर्चा करतांना वैद्यकीय अधिकारी डॉ.मणियार यांच्याकडुन कळाले की,प्राथमिक आरोग्य केंद्राला खोकल्याचे औषध उपलब्ध झाले तर बर होईल.क्षणाचाही विचार न करताजिजाभाऊ मिसाळ यांनी तात्काळ किती बाॕटल लागतील याची माहीती डाँक्टरांना विचारली आणि आज 175 बाँटल वैद्यकीय अधिकारी डॉ.मणियार यांच्याकडे सुपुर्द केल्या. तसेच कोरोणा कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र बालानगर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.मणियार व त्यांचे सर्व सहकारी खुप मेहनत करत आहेत त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने जिजाभाऊ मिसाळ यांनी डॉ.मणियार सह सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
– 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close