Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ परभणीच्या जिल्हाध्यक्षपदी विलास चव्हाण तर सचिवपदी विवेक मुंदडा यांची एकमताने निवड

परभणी / अनिल चव्हाण

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई सलग्न परभणी जिल्हा कार्यकारिणी मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध एकमताने निवडण्यात आली. सर्वानुमते दै. पुण्यनगरीचे उपसंपादक विलास चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी तर शब्दराजचे संपादक विवेक मुंदडा यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश संघटक संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे यांच्या आदेशानुसार सन 2021 वर्षाकरीता मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची नव्याने कार्यकारिणी निवड प्रक्रियेद्वारे निश्‍चित करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर परभणी येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली परभणी जिल्हा कार्यकारिणी निवडी संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ संपादक डॉ. धनाजी चव्हाण, न्यूज १८ जिल्हा प्रतिनिधी विशाल माने, ज्येेष्ठ पत्रकार गिरीराज भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये निवड करण्यात आलेल्या उर्वरीत कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी खरा दर्पणचे संपादक शेख मुजीब, सय्यद गौस, कार्याध्यक्षपदी पुण्यनगरीचे माधवराव गायकवाड, सहसचिवपदी दै. पुण्यनगरीचे गणेश पाटील तर सदस्यपदी धर्मभूमीचे संपादक मदन कोल्हे, उद्याची क्रांतीचे संपादक अरुण रणखांबे, दै. लोकसंचारचे उपसंपादक अनिल दाभाडकर, झी-न्युजचे प्रतिनिधी गजानन देशमुख, जनादर्शचे पत्रकार विष्णु सायगुंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर नुतन जिल्हाध्यक्ष विलास चव्हाण यांनी आगामी काळात परभणी जिल्ह्यात पत्रकार संघाचे संघटन अधिक मजबुत करुन उपक्रमशील आणि क्रियाशील पत्रकार संघ म्हणून कार्यकरण्याचा प्रयत्न करेल, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश संघटक संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवेल आणि लवकरच परभणी जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारिणी नव्याने निश्‍चित करण्यात येतील असे जाहीर केले. नुतन जिल्हाध्याक्षसह संपूर्ण कार्यकारिणीचे उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देवून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नुतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. वैभव स्वामी
मराठवाडा विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close