Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते “जनराज टाइम्स” च्या देवेंद्र भुजबळ विशेषांकाचे प्रकाशन


ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

औरंगाबाद/ mh20live Network

एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू व ज्येष्ठ माध्यमतज्द्न्य डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते शनिवारी, ४ जुलै रोजी औरंगाबाद येथील “जनराज टाइम्स” या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या देवेंद्र भुजबळ विशेषांकाचे अभिनव अशा ऑनलाइन पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. एखाद्या वृत्तपत्राने निवृत्त माहिती अधिकाऱ्याच्या जीवन कार्यावर आधारित विशेषांक प्रकाशित करण्याची ही बहुधा पहिलीच घटना असेल , असे सांगून हा विशेषांक माध्यमात प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करून संपादक व्ही. के. नारायणपूरकर यांच्या कल्पक, उपक्रमशिलतेचे डॉ. गव्हाणे यांनी कौतुक केले. देवेंद्र भुजबळ यांनी संपादक नारायणपूरकर यांच्या कल्पनेमुळे,पाठपुराव्याने, परिश्रमाने हा विशेषांक प्रकाशित होत असल्याचे सांगून या उपक्रमामुळे प्रसारमाध्यमात नवा पायंडा पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. या विशेषांकात देवेंद्र भुजबळ यांच्या जीवन कार्याविषयी, योगदानाबद्दल जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, नागेश शेवाळकर, मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ नरेशचंद्र काठोळे , पत्रकार राजेंद्र घरात, स्तंभलेखक मोहन सामंत , अँड. योगेश मोरे, प्रकाशिका व कवयित्री लता गुठे , पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, लेखिका रश्मी हेडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक कुंदप, विलास सरोदे इत्यादींचे लेख, अनुभव समाविष्ट आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close