Subscribe to our Newsletter
Loading
ब्लॉग्ज

विठ्ठल माझा……

विठ्ठल माझा……
वारकरी संप्रदाय हा वैश्विक पातळी वर आपल्या निस्वार्थ भक्ती साठी ओळखणारा संप्रदाय म्हणून उदयास आला आहे.आषाढी एकादशी ही वारकरी संप्रदायाची जणू दिवाळीच.विठू रायाच्या जयघोषात रममाण होणारी भक्त मंडळी देहू,आळंदी, शेगांव,मुक्ताईनगर आदी ठिकाणाहून आपल्या दिंड्या आणि पताका घेऊन भक्ती मार्गात तल्लीन होतात…
वारकरी संप्रदाय हा जळी, स्थळी, काष्टी आणि पाषाणी विठू रायाची च प्रतिमा पाहतात. पंढरपूर हे त्यांचे जणू माहेर अगदी हक्काने इथे येऊन वारकरी सुखावतो.कितीही कामाची व्याप्ती मोठी असली तरी विठू रायाच्या दर्शनापुढे ते शून्य आहे.भक्तीच्या रसात न्हाऊन निघालेली भक्त मंडळी विठू रायाच्या पंढरीत जाण्यास प्रचंड उत्सुक असतात.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा शेती वर उपजीविका साधणारा संप्रदाय आहे.इमान इतबारे कष्ट करणे आणि भक्ती मार्गात तल्लीन होणे याच मोहिमेत हा संप्रदाय असतो.अनेक भक्त आपला विठ्ठल आपल्या कामात देखील शोधतात.आपल्या वर असलेली जबाबदारी निस्पृह पणे पार पाडण्यासाठी ही मंडळी उत्सुक असते…..
पांडुरंग हरी🙏🙏

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. mh20live.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.


महेश उकर्डे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close