Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजनव्हिडीओ

दिग्‍गज कॉमेडीयन जॉनी लिव्‍हर म्‍हणतात, दीर्घकाळापर्यंतची शूटिंग कलाकारांमुळे मजेशीर बनली

दिग्‍गज कॉमेडीयन जॉनी लिव्‍हर म्‍हणतात, दीर्घकाळापर्यंतची शूटिंग कलाकारांमुळे मजेशीर बनली

प्रेक्षकांना आनंदी ठेवण्‍यासोबत त्‍यांचे मनोरंजन करण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये सोनी सबने नुकतेच त्‍यांची सर्वाधिक प्रशंसा करण्‍यात आलेली मालिका ‘पार्टनर्स ट्रबल हो गयी डबल’चे प्रसारण सुरू केले आहे. या शोमध्‍ये दिग्‍गज कॉमेडीयन जॉनी लिव्‍हर, किकू शारदा, अश्विनी काल्‍सेकर व किश्‍वर मर्चंट सारखे टेलिव्हिजन क्षेत्रातील मोठे कलाकार आहेत.

या मालिकेमध्‍ये जॉनी लिव्‍हर यांनी कमिशनर गोगोल चॅटर्जी आणि अगदी पोलिसासारखा हुबेहुब दिसणारा खबरी अशी दुहेरी भूमिका साकारली आहे. ज्‍यामुळे संकट दुप्‍पट होऊन जाते आणि त्‍यामधून प्रेक्षकांना सर्वोत्तम मनोरंजन मिळते.

या मालिकेच्‍या आठवणींना उजाळा देत जॉनी लिव्‍हर म्‍हणाले, ”सोनी सबवर पुन्‍हा एकदा ही मालिका पाहताना खूप चांगले वाटत आहे. ‘पार्टनर्स ट्रबल हो गयी डबल’साठी शूटिंग करण्‍याचा अनुभव अद्भुत होता. मी या कालावधीदरम्‍यान अनेक आठवणी साठवल्‍या आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्‍हणजे मला या मालिकेमुळे टेलिव्हिजन क्षेत्रामध्‍ये चालणा-या कार्यांबाबत समजले.”

मालिकेमध्‍ये काम करण्‍याच्‍या अनुभवाबाबत बोलताना जॉनी लिव्‍हर म्‍हणाले, ”टेलिव्हिजन मालिकेसाठी शूटिंग करण्‍याचा अनुभव अद्वितीय आहे. तुम्‍हाला सेटवर जवळपास १२ ते १३ तास व्‍यतित करावे लागतात आणि सर्व कलाकार व टीम कुटुंबासारखे बनतात. ‘पार्टनर्स ट्रबल हो गयी डबल’च्‍या अगोदर मी थोड्या कालावधीसाठी टेलिव्हिजनवर काम केले होते, पण ही मालिका माझ्यासाठी पूर्ण-वेळ काम करण्‍याचा अनुभव देणारी ठरली. मी मालिकेसाठी काम करताना प्रत्‍येक क्षणामधून काहीतरी शिकलो. किकू, अन्‍सारी, अश्विनी व इतरांसोबत काम करण्‍याचा अनुभव मजेशीर होता. अश्विनी आणि मी नेहमीच गमतीजमती करायचो आणि या डायनॅमिक कलाकारांमुळे मोठ्या कालावधीपर्यंत चालणारी शूटिंग देखील आनंददायी ठरली.”

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close