Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

वाहनास लुटमार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या बारा तासात मुसक्या आवळून केले जेरबंद

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

गंगापूर /mh20live Network

नाशिक औरंगाबाद हायवे रोडवर दिवशी पिंपळगाव फाट्यावर जनावरे वाहतूक करणारे वाहनास लुटमार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या बारा तासात मुसक्या आवळून जेरबंद करत 19 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे
पोलीसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार आसाराम बाबाराव वरकड दौलताबाद जनावरांचे व्यापारी आहेत त्यांनी देवगाव रंगारी येथे जनावरे खरेदी केल्याने ते जनावरे देवगाव रंगारी येथून दौलताबाद येथे घेऊन जाण्याचे भाडे अब्दुल अमीन मोहम्मद खाजामिया कुरेशी राहणार नूतन कॉलनी औरंगाबाद यांना देण्यात आले त्यांनी त्यांचा चालक अमजद अहमद रा .औरंगाबाद वाहक मंगेश प्रल्हाद पोळ गवळीपुरा छावणी औरंगाबाद यांना 3 जुलै रोजी सकाळी आयशर क्रमांक एम एच 20 ई एल 0 654 यामध्ये जनावरे भरून आणण्यासाठी पाठविले चालक व क्लिनर जनावरे भरून अब्दिमडी दौलताबाद कडे येत असताना सकाळी सहा वाजेच्या सुमारास नाशिक औरंगाबाद रोड वरील दिवशी पिंपळगाव फाटा येथे अनोळखी ट्रीपल सिट मोटरसायकलवर येऊन आयशर गाडीला मोटरसायकल आडवे लावून चालक व क्लिनर यांना मारहाण करून 14 लाख 50 हजार रुपयांचा आयशर व त्यामधील चार लाख 50 हजार रुपयांची जनावरे असा एकूण 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेल्याची तक्रार पोलिस स्टेशन सिल्लेगांव येथे अब्दुल अमीन मोहम्मद खाजामिया औरंगाबाद यांनी शिल्लेगांव पोलीस ठाण्यात दिल्याने 4 जुलै रोजी शिल्लेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला
सदर गुन्ह्यांमध्ये चालक वाहक यांचा सहभाग असल्याचा संशय आला पोलिसांनी क्लीनर मंगेश पोळ यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की मागील चार पाच दिवसापासून पोळ याचा मित्र सचिन काळे राहणार नंदनवन कॉलनी औरंगाबाद याने जनावरांची गाडीचे लोकेशन देऊन ताब्यात द्या त्याबद्दल चालक अमजद क्लीनर पोळ यांना प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याचे कबूल केले होते त्यावरून ठरल्या प्रमाणे 3 जूलै रोजी देवगाव रंगारी येथून जनवारे भरल्यानंतर मंगेश पोळ यांनी सचिन तायडे यास सविस्तर माहिती दिली
. चालक व किन्नर यांनी सचिन तायडे यांचे साथीदारांना जनावरांनी भरलेला आयशर ताब्यात घेऊन मारहाण करून लुटल्याचा बनाव केला सचिन तायडे यांच्यावर औरंगाबाद शहरातील पोलिस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे आयशर चालक अमजद अहमद कुरेशी राहणार बडा तकिया नूतन कॉलनी औरंगाबाद व किन्नर नामे मंगेश पोळ राहणार गवळीपुरा छावणी औरंगाबाद यांच्याकडे गुन्ह्यातील आयशर किंमत 14 लाख 50 हजार रुपयाचा तसेच पंधरा जनावरे गाय व बैल किंमत चार लाख 50 हजार व दोन मोबाईल अकरा हजार रुपये असा एकूण 19 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत पोलीस हे.कॉ विठ्ठल राख, नवनाथ कोल्हे, दीपक नागरे ,बाबासाहेब नवले ,योगेश तरमाळे, दीपेश नागझरे,चालक संजय तांदळे यांनी केली आहे तपास शिल्लेगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक शौकत अली सय्यद , हे.कॉ. बबन गायकवाड करत आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close