Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पश्चिम मतदार संघातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात यावी : आमदार संजय शिरसाट

सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र

संभाजीनगर : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेवुन आमदार संजय शिरसाट यांनी पश्चिम मतदार संघात विविध विकास कामांना मंजुरी देण्यात यावी म्हणुन पत्र दिले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये ▪️पडेगांव नाका ते दौलताबाद टी पॉइन्ट रस्त्याचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे चौपदरी बांधकाम करणे. ▪️दौलताबाद टी पॉइन्ट पासुन ते धुळे – सोलापूर महामार्गापर्यंत रस्त्याचे चौपदीकरण करणे.▪️शरणापूर – साजापूर – पंढरपूर – नक्षत्रवाडी – शिंदोन – भिंदोन – एकोड – पाचोड भालगांव – शेंद्रा रस्ता सिमेंट काँक्रीट रस्त्याचे (तीन पदरी) बांधकाम करणे. ▪️कांचनवाडी – सातारा – देवळाई – आडगांव – निपाणी कुंभेफळ ते लाडगांव रस्ता रुंदीकरणासह मजबुतीकरण करणे. ▪️शरणापूर – साजापूर – पंढरपूर – नक्षत्रवाडी – शिंदोन – भिंदोन – एकोड – पाचोड भालगांव – शेंद्रा रस्ता सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे. ▪️पैठण रस्त्याला जोणारा लिंक रस्ता कि.मी ३/०० ते ४/२०० मध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे. ▪️देवळाई – शिवगड तांडा – गाडी वाट – कचनेर रस्ता सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे. तसेच ▪️गिरनेर तांडा – बोकुड जळगांव सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे.▪️संभाजीनगर (औ.बाद) पैठण रस्ता रामा २६ वर सी.डी वर्कचे बांधकाम करणे जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे. माझ्या मतदार संघातील कामे हि लोकहिता करिता अत्यंत आवश्यक असुन, या सर्व कामांना आपण मंजुरी देण्यात यावी असे आमदार संजय शिरसाट यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close