Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान


औरंगाबाद :दिवसात दिवस आँनलाईन च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काही सण ,उत्सव ,आसे काही आसेल तर नागरीकांना माओठ्या प्रमाणात गंडा घालण्यात येते यांची दंक्षता घ्या आशा फेक संदेश ला नागरीकनी बळी पडू नका आसे आव्हान पोलीसा नी नागरीकाना केले. सविस्तर आसे की काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी नवी युक्ती काढली आहे.

मुंबईच्या जगप्रसिद्ध हॉटेल ताजच्या नावाने व्हॅलेंटाइन डेनिमित्त हॉटेलकडून सात दिवसांच्या मोफत मुक्कामासाह विविध भेटवस्तू दिल्या जाणार असल्याची लिंक व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली आहे. त्यामुळे हॉटेल ताजसह पोलिसांनी अशा कुठल्याही अनोळखी वेबसाइट, लिंकवर जाऊ नये, भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.तरुण-तरुणींमध्ये व्हॅलेंटाइन डेचा मोठा उत्साह असतो. ७ फेब्रुवारीपासूनच व्हॅलेंटाइन डे साजरा हाेण्यास प्रारंभ हाेताे. त्याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी आता आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवी युक्ती काढली. मागील काही दिवसांमध्ये साेशाल मीडियावर तशा स्वरूपाच्या लिंक व्हायरल होण्यास सुरुवात झाली. यात व्हॅलेंटाइन डेनिमित्त हॉटेल ताजकडून ७ दिवसांचा मोफत मुक्काम तुम्हाला भेट मिळाला आहे. तुमचाही क्रमांक लागू शकतो, त्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा, अशा आशयाचे मेसेज येत आहेत. त्यासोबत हॉटेलकडून आकर्षक गिफ्ट कार्ड‌्स दिले जात असल्याचेही आमिष दाखवण्यात येत आहे.विशेष म्हणजे, या संकेतस्थळावर हॉटेल ताजच्या लोगोचा वापर केल्याने अनेकांचा विश्वास बसत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी त्याचा उल्लेख करत सामान्यांनी अशा कुठल्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले. औरंगाबादमध्ये मंगळवारपर्यंत अशी कुठलीही फसवणूक झालेली तक्रार नव्हती. परंतु नागरिकांनी त्यापूर्वीच सतर्क होण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.व्हॅलेंटाइन डेनिमित्त ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घ्या, अनोळखी संकेतस्थळावरून खरेदी टाळा, वैयक्तिक माहिती शेअर करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close