वैजापूर तालुक्यातील विचित्र प्रकार वैजापूर/ गौरव धामणे वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे एक विचित्र असा प्रकार घडला आहे ज्यामध्ये एका डोकेफिरूने स्वतःच्या पत्नीच्या अल्पवयीन बहिणीला लग्नाचे आमिष दाखवून चक्क पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे.या प्रकरणाने सामाजिक वर्तुळामध्ये आश्चर्य व्यक्त होत कलयुगात माणुसकीची पातळी आणखी किती खाली जाईन अश्या चर्चेला उधान सुटले आहे.याबाबत अधिक माहिती अशी कि,९ मे रोजी जावई धोंदलगाव येथे आपल्या सासुरवाडीला मुक्कामी आले होते,सासर कडील सर्व परिवार सोबत जेवन केले,नंतर संपूर्ण परिवार निद्रेत गेला असता जावई यांनी अल्पवयीन मुलीला घेऊन सासुरवाडीतून पळ काढला.मुलगी व जावई घरात न आढळल्याने दोघांचा कुटुंबियातील सदस्यांनी खूप शोध घेतला परंतु ते काय मिळाले नाही,१० मे चा दिवस उजाडला आणि अल्पवयीन मुलीच्या वडीलांना एक फोन आला जो त्यांच्या जावईबापुनेच केला होता फोनवर जावयाने मुलीला मीच रात्री घेऊन आलो अशी ग्वाही दिली व मुलीला पुन्हा घेऊन येण्यासाठी तुम्ही दहा हजार रुपये मित्राच्या फोन-पे वर पाठवा असे सांगितले,ज्यावर सासऱ्यानी उसनवारीने पैसे आणून जावईचे मित्र राजू वायकर यांच्या फोन-पे वर साडेसात हजार रुपये रक्कम टाकली.परंतु त्यानंतर वारंवार फोन करूनही जावई मुलीला घेऊन परत आले नाही,ज्यामुळे शेवट सासर कडील मंडळीनी पोलीस ठाणे गाठत जावई उमेश शंकर निगळ, व रमेश निगळ(दोघेही रा.कापूसवाडगाव),राजू वाईकर(रा.गणेश नगर ता.संगमनेर)यांच्या विर्रूद्ध गुन्हा दाखल केला.या प्रकरणात तिन्हीही आरोपी फरार आहेत.पुढील तपास पोलीस नाईक झाल्टे करीत आहे.