Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

WhatsApp वर चॅट करताना वापरा हे सिक्रेट फीचर्स; जाणून घ्या 3 सोप्या ट्रिक

नवी दिल्ली, : व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) सातत्याने युजर्ससाठी (users) नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. जगभरात व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची संख्या वाढत असताना, व्हॉट्सअ‍ॅपमधील अनेक फीचर्स असे आहेत की त्याविषयी आपल्याला पुरेशी माहिती नसते. व्हॉट्सअ‍ॅपमधील असेच कीह फीचर आहेत, जे विशेष उपयोगी ठरु शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपवरील एखादा विशेष मेसेज आता जीमेलवरपण (Gmail) सेव्ह करता येणार आहे. तसंच चॅटमधील मिडीया फाईल्स (Media Files) एकाचवेळी डिलीट करता येणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) चॅट जीमेलवर (Gmail) सेव्ह करण्याासठी –

  • व्हॉट्सअ‍ॅपवरील खाजगी चॅट अन्य व्यक्तीला जीमेलवरुन पाठवू शकता
  • तसंच हे चॅट जीमेलवर सेव्ह करुन ठेवू शकता.
  • चॅट पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमधील सेंटिगमध्ये जाऊन हिस्ट्री एक्सपोर्ट चॅटवर जा.
  • त्यानंतर ज्या व्यक्तीसोबत चॅट केलंय ते चॅट सिलेक्ट करा
  • तिथे मीडिया फाईल्ससह किंवा मीडिया फाईल्सव्यतिरिक्त चॅट एक्सपोर्ट (Chat export) करण्याचा पर्याय असेल. त्यापैकी तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडा.

(वाचा – हॅकर्सकडे आहे तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड? वाचा कसं तपासाल)
ऑनलाईन न जाता चॅट कसं वाचाल?

जर ऑनलाईन जाऊन एखादं चॅट वाचायचं आहे आणि अन्य कोणालाही तुम्ही ऑनलाईन (Online) होतात हे माहिती होऊ नये, यासाठी फोन एरोप्लेन मोडवर न्यावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करुन ज्या व्यक्तीचं चॅट वाचायचं आहे ते वाचू शकता. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप बंद करुन एरोप्लेन मोड (Aeroplan Mode) काढून टाकावा. यामुळे तुम्ही ऑनलाइन होतात हे कोणालाही समजणार नाही.

(वाचा – जुन्या स्मार्टफोनवर बंद होणार whatsapp? जाणून घ्या काय आहे सत्य)
खासगी (Secret) व्हॉट्सअ‍ॅप चॅट कसं लपवाल?
अर्काइव्ह चॅटस फीचर हे व्हॉट्सअ‍ॅप चॅट चॅटस्क्रिन डिलीट न करता हटवते. यामुळे तुम्ही, तुम्हाला पाहिजे तेव्हा खासगी (सिक्रेट) चॅट परत मिळवू शकता. या फीचरच्या मदतीने ग्रुपवरील किंवा खासगी चॅट लपवून ठेवू शकता. फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप सुरु करुन जे चॅट तुम्ही लपवून ठेवू इच्छिता ते चॅट थोडावेळ प्रेस करा त्यानंतर त्यावर काही ऑप्शन्स दिसतील, त्यात अर्काइव्ह (Archive) हा ऑप्शन दिसेल त्यावर प्रेस करा आणि आपला मेसेज लपवून ठेवा.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close