Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

आव्हाना ग्रामपंचायत सरपंच पदी रेणुका दुधे व उपसरपंच पदी नामदेव सरोदे यांची बिनविरोध निवड


आव्हाना/सुरेश गिराम

भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक आज दुपारी एक वाजता पार पडले असून या निवडणुकीमध्ये रेणुका दुधे यांची सरपंच पदी व नामदेव सरोदे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
आव्हाना ग्रामपंचायत 2021 साठी दोन पॅनलचा माध्यमातून निवडणूक झाल्यानंतर
भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत फायनलला 11 जागा मिळाल्या होत्या. आज बुधवार दिनांक 10 2 2021 रोजी सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान सरपंच व उपसरपंच दोनच फॉर्म दाखल झाल्यामुळे या ठिकाणी सरपंच व उपसरपंचपदांची निवड ही बिनविरोध झाल्या ची आध्याशी निवडणूक अधिकारी म्हस्के यांनी जाहीर केले यावेळी ग्राम विकास अधिकारी एस बी साळवे, अभय कुलकर्णी यांची उपस्थिती होती सर्व सदस्यांनी या मीटिंगसाठी उपस्थिती लावल्यामुळे मीटिंगमध्ये निवडीच्या वेळी खेळीमेळीचे वातावरण दिसून आले. माजी आमदार कै भाऊसाहेब गावंडे यांच्या प्रतिमेचे पूजन नवनिर्वाचित सरपंच यांच्या हस्ते व सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पॅनल प्रमुख सुनील पा.सरोदे, खरेदी विक्री संघ सभापती गणेश पा ठाले, माजी सरपंच शेख सत्तार, प्रभाकर ठाले प्राध्यापक भाऊसाहेब ठाले, राजकुमार राजपुत माजी सभापती भानुदास सरोदे ,सभापती विनोद गावंडे, प्रमोद गावंडे, पंडीत राऊत,लिंबाजी दुधे,
……….
सर्व निवडून आलेले सदस्य व ग्रामस्थ यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून मला मतदान केले व सरपंचपदी विराजमान केले याची जाण ठेवून गाव विकासासाठी अहोरात्र काम करेल. अशी प्रतिक्रिया सरपंच रेणुका दुधे यांनी दिली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close