Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

अनलॉक-4 च्या गाईडलाईन्स जारी:राज्य सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील जिल्हाबंदी उठवली, यापूढे ई-पासची गरज नाही


मुंबई- शाळा-कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच
राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनलॉक-4 च्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार, मार्च महिन्यापासून सुरू असलेली जिल्हा बंदी अखेर उठवली आहे. आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज नसेल.

राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू करण्यास परवानगी असेल. परंतू, अद्याप मेट्रो आणि सिनेमा गृहांना परवानगी देण्यात आलेली नाही. राज्याने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबईतील विमानसेवेतील उड्डाणांची संख्या दुप्पट केली जाणार आहे.

जाणून घ्या अनलॉक-4 मध्ये काय सुरू आणि काय बंद?

शाळा-कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच
30 सप्टेंबरपर्यंत मेट्रोलाही रेड सिग्नल
खासगी बस आणि मिनी बसला परवानगी
चित्रपटगृह 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही
राज्यातील हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार
संस्कृतिक, सामाजिक, क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातले कार्यक्रम तसेच मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र येता येणार नाही
अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आधीच्या नियमावलीचे पालन करतील
मुंबई आणि एमएमआर एरिया तसेच पुणे पिंपरी या क्षेत्रांमध्ये ऑफिसमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थिती राहता येईल
सर्व कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य
प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार तर रिक्षामध्ये तीन प्रवाशांना मुभा
खासगी चारचाकी वाहनात चार लोकांना प्रवास करण्याची मुभा
50 पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येता येणार नाही
अंत्यविधीसाठीही 20 पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाही

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close