Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

जोपर्यंत रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही

धुळे | जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असं वक्तव्य राज्याचे महसूल आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी बोलताना सत्तार यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
राम मंदिराच्या नावाखाली भाजप राजकारण करत आहे. भाजपचे राजकारण म्हणजे मुँह में राम अन् बगल में छुरी सारखं आहे, अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका केवळ निवडणुका नाहीत. तर भाजपला धडा शिकवण्याची ही संधीच आहे म्हणून समजा. या निवडणुकीत भाजपला धडा शिकवून शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा, असं सत्तर म्हणाले.

तसेच सत्तार यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपकडून होत असलेल्या राजकारणावर देखील हल्लाबोल केला आहे. राम मंदिराच्या नावाखाली भाजप राजकारण करत आहे. भाजपचे राजकारण म्हणजे मुँह में राम अन् बगल में छुरी सारखं आहे, अशी टीका सत्तार यांनी भाजपवर केली आहे.
भाजपला धडा शिकवा : राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका केवळ निवडणुका नसून भाजपला धडा शिकवण्याची संधी म्हणून समजा. या निवडणुकीत भाजपला धडा शिकवून शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा. जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला तरच शिवसेनेची ताकद दिसून येईल, असे सत्तार म्हणाले आहे. तसेच तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन सत्तार यांनी दिले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close