Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

अज्ञात वाहनाची हुलकावणी, ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटून, चार ठार

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील देवळ्यापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या भावडबारी घाटाच्या पायथ्याशी वळणावर अज्ञात वाहनाच्या हुलकावणीमूळे ट्रॅक्टरचालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर पटली झाल्याने 4 जण ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्वजण चांदवड तालुक्यातील शिंदे भह्यळे व पुरी येथील रहिवासी असून एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत.नाशिक जिल्ह्यातील देवळ्यापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या भावडबारी घाटाच्या पायथ्याशी वळणावर अज्ञात वाहनाच्या हुलकावणीमूळे ट्रॅक्टरचालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर पलटला. याबाबत पोलिस सूत्रांनी व अपघातातील जखमींनी दिलेली माहिती अशी की, पुरी ता.चांदवड येथील मधुकर भवर यांनी भावडे ता.देवळा शिवारात आठ दिवसांपूर्वी पाच एकर जमीन विकत घेतली होती. तिच्या मशागतीसाठी मधुकर भवर यांची पत्नी, मुलगा, दोन सुना, दोन नातू, नात व शिंदे भह्यळे येथील व्याही, व्याहीन हे आज (दि.6) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील भावडे येथे व्याही भाऊसाहेब पर्वत काळे यांच्या ट्रॅक्टरने येत असताना भावडबारी घाटाच्या पायथ्याशी अज्ञात वाहनाने ट्रॅक्टरला हुलकावणी दिल्याने ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्यात ट्रॅक्टरचालक भाऊसाहेब पर्वत काळे ( वय 55 वर्षे रा. शिंदे बाह्यळे), सोनू विजय भवर ( वय 10 वर्षे) सुनीता विजय भवर ( वय 38 वर्षे दोन्ही राहणार पुरी ता.चांदवड) हे जागीच ठार झाले तर विजय मधुकर भवर ( वय 46 वर्षे) यांना मालेगाव येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले असता त्यांचा तेथे मृत्यू झाला त्यामुळे सदर अपघातात पुरी येथील एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलगा हे तीन ठार झाले आहेत. तर, मधुकर भवर यांचे शिंदे भह्यळे येथील व्याही भाऊसाहेब काळे ठार झाल्याने शिंदे भह्यळे व पुरी येथे शोककळा पसरली. गंभीर जखमींमध्ये अशाबाई भाऊसाहेब काळे( वय 50 वर्षे,रा.शिंदे बाह्यळे) मनीषा विशाल भवर( 30 वर्षे), दिया विशाल भवर( 10 वर्षे) , साहिल विशाल भवर( 8 वर्षे), सुमन मधुकर भवर( 60 वर्षे) आदींचा समावेश असून त्यातील तिघांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close