मुंबई, 14 मे : संभाजीनगर नामांतर करायची गरज काय ? आहेच तेे संभाजीनगर. नामांतर करायची गरजच काय आहे. ओवेसी येऊन गेला. तिथे औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवलं. यांच्या ए टीम बी टीम पाठवल्या जात आहे. कुणाच्या हातात भोंगा द्यायचा, कुणाच्या हातात हनुमान चालीसा देणार आणि हे मजा बघत बसणार आहे. आम्ही मग काय टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेण्यासाठी बसलो आहोत का? असा सणसणीत टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. मुंबईतील बिकेसी मैदानावर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विराट सभा पार पडली. या सभेत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘तिथे औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवलं. यांच्या ए टीम बी टीम पाठवल्या जात आहे. कुणाच्या हातात भों असा सणसणीत टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.गा द्यायचा, कुणाच्या हातात हनुमान चालीसा देणार आणि हे मजा बघत बसणार आहे. आम्ही मग काय टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेण्यासाठी बसलो आहोत का, या तिनपाटांना झेड प्लस सुरक्षा देतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. तुम्ही ढकललं म्हणून काँग्रेस सोबत गेलो. पण हिंदुत्व नाही सोडलं. हिंदुत्वापुढे आम्हाला सत्ता महत्वाची नाही. तुम्ही पहाटे शपथ घेतली आम्ही उघड गेलो. NDA मध्ये एकही खासदार नसलेले अनेक पक्ष होते. नितीशकुमार म्हणतो की भोंगा बकवास आहे आणि त्यालाही NDA मध्ये घेतलं. काश्मीर मध्ये मुफ्ती महंमद बरोबर सरकार स्थापन केलं, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.