औरंगाबाद, 08 जून : ‘संभाजीनगर कधी करणार? या शहराचे नुसते नामातंर करणार नाही तेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना अभिमान वाटेल असं शहर उभं करेन, असं वचन देतो. नाव बदलायला काय आता बदले. पण तुम्हाला रस्त्यावर खड्डे दिले, नामांतर केलं, पाणी नाही दिलं, नाव बदल आणि रोजगार नाही दिले कसं चालेल. संभाजीराजे सुद्धा मला रायगडावर टकमक टोका दाखवतील’ असं शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पष्टपणे बोलले.
औरंगाबादमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट अशी सभा सुरू आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आणि संभाजीनगरच्या नामांत्तरावर स्पष्ट बोलले.
‘संभाजीनगर कधी करणार? संभाजीनगरचा ठरवा हा दीड वर्षांपूर्वी मंजूर केला आहे. विमानतळाचे नाव संभाजीनगर करा असं सांगितलं आहे. केंद्राकडे प्रस्ताव दिला आहे. पण त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. तुमच्याकडे काही दिलं तर झाकून ठेवायचा आणि आम्ही काही केलं नाही बोंबलत सुटायचं हा आक्रोश होऊ शकत नाही. जर तुमच्यात प्रामाणिकपणा असेल तर जाऊन केंद्राकडे बोला. या शहराचे नुसते नामातंर करणार नाही तेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना अभिमान वाटेल असं शहर उभं करेन, असं वचन देतो. नाव बदलायला काय आता बदले. पण तुम्हाला रस्त्यावर खड्डे दिले, नामांतर केलं, पाणी नाही दिलं, नाव बदल आणि रोजगार नाही दिले कसं चालेल. संभाजीराजे सुद्धा मला रायगडावर टकमक टोका दाखवतील,केंद्राकडे जो प्रस्ताव दिला आहे, तिथे जाऊन आक्रोश करा, आमच्या राज्य सरकारने प्रस्ताव मांडला आहे, तो मंजूर करा. तर आम्ही तुमचा सत्कार करू, असंही उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.