Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दखल



मुंबई, दि. २१ :- पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात निर्देश दिले.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहचले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटला लागलेल्या आगीचे वृत्त समजताच मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राज्यातील संसद सदस्यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीतूनच या घटनेची दखल घेतली व तातडीने कृती करण्याच्या सूचना दिल्या.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close