Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ,कन्नड – सिल्लोड महामार्गावरील घटना

कन्नड –कन्नड-सिल्लोड रस्त्यावर अज्ञात वाहनाने पाठीमागून हूल दिल्याने नाचनवेल येथील  शेतकरी अशोक नारायणराव थोरात (वय-४९) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मोहाडी फाट्याजवळ  घडली . याबाबत अधिक माहिती अशी की  कन्नड शहरातील शांतीनगर येथे स्थायिक असलेले थोरात काही कामानिमित्त मूळगावी नाचनवेलकडे येत असताना मोहाडी फाट्यानजीक पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला ( एम एच २० बी डी ६०२७ ) ला  जोराची धडक दिली.यात दुचाकी दूरपर्यंत घसरत गेल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली.परिसरातील शेतकरी व नागरिकांनी त्यांना उपचारासाठी तत्काळ नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हरिशकुमार बोराडे,सतीश बडे,विजय आहेर, पाटील, यांनी घटनास्थळी धाव घेऊन  पंचनामा केला.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय राजभोज,डॉ.शीतल बाविस्कर,सतीश राजपुत यांनी शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.नाचनवेल येथील स्मशानभूमीत सायंकाळी सात वाजता थोरात यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.कुलदीप थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  पिशोर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.अशोक थोरात हे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक राजाराम थोरात यांचे पुतणे तर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विठ्ठलराव थोरात यांचे लहान बंधू होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close