Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी :धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाटा जवळील घटना

पाचोड :धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील मुरमा फाटा नजदीक एका भरधाव वेगातील कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली आहे           अधिक माहिती अशी की चंन्नापुरी तालुका अंबड जिल्हा जालना येथील रहिवासी अमोल दिलीप उडदंगे वय 26 वर्ष हा युवक पैठण तालुक्यातील पाचोड येथे घरगुती कामासाठी मंगळवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान आपली दुचाकी क्रमांक एम एच 21 यु ४८४४ ने जात असताना बीड वरून औरंगाबाद कडे भरधाव वेगात जात असलेल्या कार क्रमांक एम एच ०४ एफ झेड 75 24 ने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाला आहे या अपघाताची माहिती मुजीप पटेल क्रांती मजदूर सेना महाराष्ट्र अध्यक्ष व कोळी बोडखा ग्रामपंचायत सदस्य एजाज पटेल यांना कळताच तत्काळ घटनास्थळी पोहोचून अमोल उडदगे याला एका खाजगी वाहनात टाकून पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यासाठी दाखल केले आहे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस करत आहेत

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close