Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

दर्शनासाठी जाताना दोन बहिणीचा नदीपात्रात बुडून मृत्यू,कन्नड तालुक्यातील खामगांव येथे शोककळा

पाण्यात बुडत असलेल्या आजीना मजुरांनी वाचवले

  कन्नड / कल्याण पाटील 

तालुक्यातील खामगाव येथील खारी नदी पात्रात बुडून दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दिनांक १३ आक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेदरम्यान घडली. आरती कैलास कवडे (२२) आणि ऋतुजा शिवाजी कवडे (१८) अशी मृत चुलत बहिणींची नावे आहेत. त्या दोघी आजी आणि वहिनीसोबत अधिक मासानिमीत्त महादेवाच्या मंदीरात दर्शनासाठी जात होत्या.या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यातील खामगाव येथे शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खामगाव येथील खारी नदीच्या जवळ महादेवाचे मंदिर असून. भाविक अधिक मासानिम्मित येथे पूजा करतात. येथे दर्शनासाठी जाण्यास गावातील आरती कैलास कवडे (२२) आणि ऋतुजा शिवाजी कवडे (१८) या चुलत बहिणी आजी देऊबाई गजानन कवडे. आणि वाहिनीसोबत सकाळी ६ वाजता गावातून निघाल्या. यावेळी नदीत स्नान करून देवदर्शन घ्यावे म्हणून त्या नदी पात्रात उतरल्या. नदीला जास्त पाणी नाही. मात्र, नदीत ठिकठिकाणी मोठे खड्डे झाले आहेत. यातील एका खड्ड्यात पाय घसरून आरती बुडाली. तिला वाचविण्यासाठी श्रतुजाने धाव घेतली असता ती सुद्धा खड्ड्यात बुडाली यातच दोघींचा मृत्यू झाला.या दोन्ही जणांना वाचवण्यासाठी आजी देऊबाई कवडे यांनी पाण्यात उडी मारली मात्र त्यांचाही जिव धोक्यात आला होता . मात्र जवळच यु.पी राज्यातील मजूर काम करत असताना त्यांना पाण्यात आजी दिसताच मजूरांनी पाण्यात उडी मारुण आजीना सुखरूप बाहेर काढले. ही घटना गावातील लोकांना कळताच गावकऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली.व नदीपात्रातून दोन्ही मुली  बाहेर काढण्यात आल्या. त्यांना उपचारासाठी औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.वैधकीय अधिकारी यांनी या दोन्ही मुलींना तपासून मृत घोषीत केले. मयत मूली ह्या सख्या चुलत बहिनी व एकाच कुटुंबातील असल्याने खामगावावर मोठी शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार संजय वारकड , साहयक पोलिस निरीक्षक संजय अहिरे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . याप्रकरणी देवगाव् रंगारी पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे. पुढील  तपास  देवगांव रंगारी पोलीस ठाण्याचे सह्याक पोलीस निरीक्षक संजय अहिरे हे करीत आहेत.     सध्या धोडयाचा महीना सुरु आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून नदिवर स्नान करुण देवदर्शनासाठी महिला जातात. यात नदीकाठी असलेल्या महादेव मंदिरात सकाळपासून देवदर्शनासाठी महिलांची गर्दी होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close